महापालिकेची पथके करणार आजपासून शहरात तपासणी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

जळगाव : राज्यात शनिवारपासून (23 जून) प्लॅस्टिक बंदीची कारवाई सुरू करण्यात आली. जळगावात मात्र महापालिकेतर्फे उद्यापासून (25 जून) ही कारवाई करण्यात येणार आहे. 
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ही कारवाई करण्यात येणार आहे. प्रारंभी सकाळी दहाला आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या दालनात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक होईल. त्यानंतर महापालिकेचे पथक कारवाईसाठी शहरात फिरणार आहे. 

महापालिकेचे आरोग्याधिकारी उदय पाटील यांनी कळविले आहे, की आरोग्य अधीक्षक, निरीक्षक, युनिट प्रमुख यांचे पथक शहरात फिरणार आहे. दुकानदार, फेरीवाले, तसेच नागरिक यांच्याकडे प्लॅस्टिक कॅरिबॅग, चहाचे ग्लास, पाणी ग्लास, प्लेट, वाटी, चमचे, पाणी पाऊच, थर्माकोल साहित्य, तत्सम साहित्य वापरताना, विक्री किंवा साठवणूक करताना आढळल्यास पाच हजार रुपये दंड करण्यात येईल. 

प्लॅस्टिक बंदीच्या आदेशानुसार शहरात उद्यापासून (25 जून) कडक कारवाई करण्यात येणार आहे. प्लॅस्टिक, थर्माकोल बाळगणारे नागरिक, दुकानदार, विक्रेते यांना पाच हजाराचा दंड आकारण्यात येईल, यासाठी आरोग्य निरीक्षक, अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. 
- उदय पाटील आरोग्याधिकारी, महापालिका, जळगाव.

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation plastic ban