"मनपा' कर्जबाजारी असताना ठेकेदारांची 11 कोटींची बिले अदा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

जळगाव ः महापालिकेतर्फे कर्जबाजारी असल्याचे नेहमी सांगितले जाते. परंतु आमच्याकडे पैसे नसल्याची ओरड करणाऱ्या महापालिकेने नऊ महिन्यांत ठेकेदारांची 11 कोटी 36 लाख 45 हजार 211 रुपयांची बिले अदा केली, अशी माहिती दीपककुमार गुप्ता यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविली आहे. 

जळगाव ः महापालिकेतर्फे कर्जबाजारी असल्याचे नेहमी सांगितले जाते. परंतु आमच्याकडे पैसे नसल्याची ओरड करणाऱ्या महापालिकेने नऊ महिन्यांत ठेकेदारांची 11 कोटी 36 लाख 45 हजार 211 रुपयांची बिले अदा केली, अशी माहिती दीपककुमार गुप्ता यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविली आहे. 
महापालिका, हुडको, जिल्हा बॅंक, तसेच मुदत सपलेल्या गाळ्यांप्रश्‍नी अद्याप मार्ग निघालेला नाही. त्यामुळे महापालिका कर्जबाजारी असल्याने नागरिकांना मूलभूत सुविधा देता येत नसल्याचे कारण सांगितले जाते. तसेच कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासही वेळेवर रक्कम देता येत नसल्याचे सांगितले जाते. शिक्षकांचे पन्नास टक्के वेतनाचे सुमारे पंधरा कोटी रुपये महापालिकेकडे थकित आहे. असे असताना ठेकेदारांची बिले प्रमाणात कशी काय दिली जातात? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 

डांगे यांच्या काळात बिले अदा 
तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे असताना मागील वर्षी "मनपा'कडे ठेकेदारांची बिले अदा केली गेल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यांनी 15 जानेवारी 2019 ला 1 जुलै 2018 ते 31 मार्च 2019 या नऊ महिन्यांत ही बिले अदा केली असल्याचे समोर आले आहे. 

738 बिलांचे पैसे दिले 
नऊ महिन्यांत विविध निधींतून विविध कामांची 738 बिले मंजूर केली आहेत. यामध्ये सर्वसाधारण निधीतून आठ कोटी 42 लाख 29 हजार 634 रुपयांची 419 बिले अदा केली, तसेच निवडणूक फंडातून एक कोटी 56 लाख 64 हजार 887 रुपयांची 309 बिले, तर एक बिल एक कोटी चाळीस लाख सात हजार 645 रुपयांचे काढण्यात आले. रस्त्यांच्या दुरुस्तीचे 26 लाख 82 हजार रुपयांची सहा बिले तर इंडस इंड प्रकारातील तीन बिले एक कोटी वीस लाख 74 हजार 805 रुपयांची अदा केली आहेत. निवडकच ठेकेदारांची बिले अदा झाल्याचेही गुप्ता यांनी सांगितले 

Web Title: marathi news jalgaon muncipal corporation takedar 11 carrore bill