कामबंद आंदोलनात महापालिकेच्या अठराशे कर्मचारी सहभागी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

जळगाव ः महापालिकेची आर्थिक परिस्थिती दयनीय होवून कर्मचाऱ्यांचे पगार, महागाई भत्ते गेल्या चार वर्षापासून थांबले आहे. त्यामुळे मनपाच्या मुदत संपलेल्या 20 व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेवून ई- लिलाव करावा. या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे "कामबंद' आंदोलनाला आजपासून सुरवात झाली. आंदोलनात सर्व विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने आज महापालिकेतील कामकाज ठप्प होते. तर सर्व विभागाच्या कार्यालयांना कुलूप लागलेले होते.

जळगाव ः महापालिकेची आर्थिक परिस्थिती दयनीय होवून कर्मचाऱ्यांचे पगार, महागाई भत्ते गेल्या चार वर्षापासून थांबले आहे. त्यामुळे मनपाच्या मुदत संपलेल्या 20 व्यापारी संकुलातील गाळे ताब्यात घेवून ई- लिलाव करावा. या मागणीसाठी अखिल भारतीय सफाई मजदूर संघातर्फे "कामबंद' आंदोलनाला आजपासून सुरवात झाली. आंदोलनात सर्व विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा समावेश असल्याने आज महापालिकेतील कामकाज ठप्प होते. तर सर्व विभागाच्या कार्यालयांना कुलूप लागलेले होते. मात्र दुपारी साडेतीनला जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्‍त किशोरराजे निंबाळकर यांनी 25 एप्रिलपर्यंत कारवाई करण्यासंदर्भात आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

मुदत संपलेल्या गाळ्यांचा लिलाव करून येणाऱ्या उत्पन्नातून कर्मचाऱ्यांचे देणी द्यावे या मागणीसाठी आयुक्तांना सफाई मजदूर संघातर्फे आयुक्तांना आठ दिवसापूर्वी निवेदन दिले होते. त्यानुसार आंदोलनाच्या तिसऱ्या टप्प्यांत आज कामबंद आंदोलन करण्यात आले. महापालिका कर्मचाऱ्यांनी सोमवार 16 एप्रिलपासून गेल्या चार वर्षापासून वेतन व पेन्शनसह सुमारे 40 कोटी रुपये थकले असल्याने विविध स्वरूपात आंदोलन सुरू केले आहे. यात त्यांनी सोमवारी महापालिका कर्मचारी संघटनेने काळ्या फिती लावून काम केले होते. यानंतर मंगळवार 17 रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. तर बुधवारी अक्षय तृतीयानिमित्त पालिकेला सुटी असल्याने आज गुरूवार 19 एप्रिलपासून कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. 

कर्मचाऱ्यांचे प्रवेशद्वारासमोर ठिय्या 
कामबंद आंदोलनात सहभाही होण्यासाठी आज सकाळीच सर्व कर्मचारी 9.30 वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य गेटजवळ जमले होते. यात प्रभाग समिती 1 ते 4 चे सर्वंच कर्मचारी सहभागी झाले आहेत. तर "या प्रशासनाचे कारायचे काय', "हम सब एक है चा नारा', "कर्मचारी संघटनांचा विजय असो' अशा विविध घोषणांबाजीने मनपा परिसर आज दाणाणून सोडला. यात सफाई कर्मचाऱ्यांपासून तर विभाग प्रमुख पर्यंतचे अधिकाऱ्यांचा समावेश होता. 

उपायुक्तांनी स्वतः उघडले दरवाजे 
महापालिकेच्या 17 मजली प्रशासकीय इमातरीत केवळ राजपत्रीत अधिकारी उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त डॉ. लक्ष्मीकात कहार, शहर अभियंता डी.बी. दाभाडे व निवडणूकीचे कामकाज पाहणारे दोन कर्मचारी हजर होते. तर उपायुक्त डॉ. कहार यांनी स्वतःच विभागाचे तसेच कार्यालयाचे लागलेले कुलूप उघडावे लागले. तर उपायुक्त खोसे यांच्याकडे निवडणूकीचे काम सुरू असल्याने त्यांच्याकडे कर्मचारी होते. मात्र, शहर अभियंता श्री. दाभाडे यांचे कार्यालय बंद असल्याने उपायुक्त खोसेंच्या कार्यालयात दोन्ही अधिकारी बसून होते. 

दुपारी आंदोलन मागे 
महापालिका कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आंदोलन दुपारी साडेतीनला मागे घेतले. प्रभारी आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी गाळे जप्ती व लिलावाची प्रक्रिया 25 एप्रिलपासून करण्याचे आश्‍वासन दिले. यानंतर कर्मचारी संघटनेने 24 एप्रिलपर्यंत आंदोलन मागे घेतले असून, 25 पासून कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. 

Web Title: marathi news jalgaon muncipalcorporation karmchari aandolan