मनपाचे "ते' 397 भूखंड ताब्यात घेणार : आयुक्त डांगे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

जळगाव ः तत्कालीन नगरपालिका व महापालिकेच्या खुल्या जागा सेवाभावी संस्थांना सार्वजनिक वापरासाठी दिल्या होत्या. यात काही जागा विकसित करून तेथे व्यावसायिक वापर केला जात आहे. तर काही जागा अविकसित आहेत. या जागांच्या कराराची मुदत संपुष्टात आली असल्याने या सर्व जागा महापालिका लवकरच ताब्यात घेणार आहे. तसेच या जागा निविदा प्रक्रियेद्वारे पुन्हा तीन-तीन वर्षांच्या कराराने देण्यात येतील. 

जळगाव ः तत्कालीन नगरपालिका व महापालिकेच्या खुल्या जागा सेवाभावी संस्थांना सार्वजनिक वापरासाठी दिल्या होत्या. यात काही जागा विकसित करून तेथे व्यावसायिक वापर केला जात आहे. तर काही जागा अविकसित आहेत. या जागांच्या कराराची मुदत संपुष्टात आली असल्याने या सर्व जागा महापालिका लवकरच ताब्यात घेणार आहे. तसेच या जागा निविदा प्रक्रियेद्वारे पुन्हा तीन-तीन वर्षांच्या कराराने देण्यात येतील. 
तत्कालीन नगरपालिकेने आपल्या मालकीच्या शहर हद्दीतील 397 खुल्या जागा या 1996 ला सार्वजनिक वापरासाठी दिल्या होत्या. परंतु काही संस्थांनी करारनाम्याच्या अटी-शर्तींचा भंग केल्याचे प्रशासनाने सर्व खुल्या जागांचे केलेल्या सर्वेक्षणातून आढळून आले होते. त्यामुळे कलम 81 "ब' नुसार अविकसित जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया तसेच विकसित जागांचा ठराव रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. याबाबत तसा ठराव प्रशासनाने महासभेत मांडला होता. 

ठरावात सहा महिन्यांची मुदत 
महासभेने 29 एप्रिल 2017 ला ठराव क्रमांक 632 मध्ये ज्या संबंधित संस्थांना दिलेल्या जागा देऊनही विकसित केल्या नाहीत, अशांना शेवटची संधी म्हणून सहा महिन्यांची मुदत द्यावी. तसेच करारातील अटी-शर्तीनुसार ज्या संस्थांनी कायदेशीर पूर्तता केली, मात्र जागा विकसित केल्या नाही, अशा संस्थांना वर्षभराची मुदत मिळावी, असा ठराव महासभेने केला होता. 

शासनाने ठराव केला निलंबित केला 
महापालिका प्रशासनाने मात्र हा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला होता. यात महासभेने केलेला ठराव हा नियमबाह्य व लोकहिताविरुद्ध असल्याने महानगरपालिका अधिनियम कलम 451(1) अन्वये शासानाने हा ठराव निलंबित केलेला आहे. 

तीन वर्षांच्या कराराने जागा 
महापालिका प्रशासनाने खुल्या जागांच्या केलेल्या सर्वेक्षणात विकसित व अविकसित जागा निदर्शनास आल्या आहेत. त्यानुसार त्या ताब्यात घेतल्या जातील. त्यानंतर विकसित केलेल्या जागा तीन वर्षांच्या कराराने निविदा प्रक्रियेद्वारे दिल्या जाणार आहे. 

सेवाभावी संस्थांना ज्या प्रयोजनासाठी खुल्या भूखंडाच्या जागा दिल्या होत्या, त्या प्रयोजनाचा वापर न करता 
व्यावसायिक वापर होत आहे. तसेच जागांच्या कराराची मुदत संपली आहे. त्यामुळे या जागा लवकरच ताब्यात घेतल्या जातील. 
- चंद्रकांत डांगे, आयुक्‍त, महापालिका 

अशी आहे आकडेवारी 
- 397 खुल्या जागा 
- 213 विकसित जागा 
- 184 अविकसित जागा 
...... 
प्रभाग समिती अविकसित जागा 
प्रभाग समिती एक............ 56 
प्रभाग समिती दोन.............38 
प्रभाग समिती तीन.............61 
प्रभाग समिती चार.............29 

Web Title: marathi news jalgaon municipal corporation bhukhand