नांद्रा येथील तेरा वर्षीय मुलीचा स्वाईम फ्ल्यूने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा,
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

नांद्रा (ता.पाचोरा) ः येथील रहिवासी व सध्या नाशिक येथे वास्तव्यला असलेल्या रुचिता समाधान तावडे (वय 13) हीचा स्वाईम फ्ल्यू आजाराने नाशिक येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एका सहा वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. 

नांद्रा (ता. पाचोरा) येथील दोन तावडे कुटूंबातील लहान चिमुकल्यांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना आज घडल्या असून, गावात शोककळा पसरली आहे. स्वाईन फ्ल्यूने मृत झालेली रुचिता ही हभप लोटन महाराज यांची नात होती. तसेच सैन्य दलातील निवृत्त सैनिक समाधान तावडे यांची मुलगी असून ते सध्या नाशिक येथे वास्तव्याला आहेत. रूचिताला स्वाईन फ्ल्यू झाला असल्याने तिच्यावर नाशिक येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू 
नांद्रा येथील सोमू नरेंद्र तावडे (वय 6) याचा खदानीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. सोमू तावडे हा सैन्य दलातील सैनिक नरेंद्र तावडे यांचा मुलगा व सरपंच शिवाजी तावडे यांचा पुतण्या होता. सुटीवर आलेल्या वडीलांसोबत तो फिरायला गेल्या असताना त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon nandra swain flyu girl death