टॅंकरचे पाणी टाकून कापूस जगवण्यासाठी धडपड 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

नांद्रा (ता. पाचोरा) ः पुर्व हंगामी कापूसाची लागवड झाली आहे. परंतू, पाणी मिळत नसल्याने जेमतेम पाण्यावर लागवड करुण शेतकरी बुचकळ्यात सापडला आहे. विहिरी आटल्यामुळे पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. यामुळे अनेक शेतकरी पाणी विकत घेवून ते टॅंकरद्वारे विहिरीत टाकून कापूसाला पाणी देवून जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. 

नांद्रा (ता. पाचोरा) ः पुर्व हंगामी कापूसाची लागवड झाली आहे. परंतू, पाणी मिळत नसल्याने जेमतेम पाण्यावर लागवड करुण शेतकरी बुचकळ्यात सापडला आहे. विहिरी आटल्यामुळे पिकांना पाणी देणे अडचणीचे ठरत आहे. यामुळे अनेक शेतकरी पाणी विकत घेवून ते टॅंकरद्वारे विहिरीत टाकून कापूसाला पाणी देवून जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. 
जुनचा शेवटच्या आठवडा उलटत असून देखील नैऋत्य मौसमी किंवा पुर्वमौसमी पावसाने हजेरी न लावल्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत. पुर्व हंगामी कापुस पिके वगळता कोणत्याही पिकाची लागवड झालेली नाही. पुर्व मोसमी कापुस पिकाचीही वाढ खुंटली आहे. मृग नक्षत्र संपण्यावर आला असून, आद्रा नक्षत्राला प्रारंभ झाला आहे. तरीदेखील पावसाला सुरुवात नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मृग नक्षत्राच्या सुरवातीला पेरणी झाल्यानंतर कडधान्य उडीद, मुंग, सोयाबिस, मट, चवळी पिकांचा पेरा कमी होवून उत्पन्नावर याचा परिणाम जाणविण्याची शक्‍यता आहे. परंतु पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या आशा लोप पावल्या आहेत. कापूस पिकाची लागवड हि जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यत लावण्याची शिफारस कृषी विद्यापीठाने दिली आहे. पाऊस लांबल्याने पिकस्थिती बदलणार; कृषी केंद्रांवर सुकसुकाट 

पाऊस लाबल्याने चारा टंचाई 
जुन महिना संपत आला तरीही पावसाने हजेरी न लावल्यामुळे चाऱ्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. पाऊस पडल्यानंतर शेतातील बांधावर किंवा माळराणावर चारा उपलब्ध नसल्याने गुरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. कोरड्या चाऱ्यावरच गुरांची मदार आहे. यात गिरणा नदीला आवर्तन सोडण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. या भागात पाणीटंचाई जाणवली नाही. परंतु ज्या गावांना बहुळा धरण किंवा गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोतावरुन पाणीपुरवठा होतो. त्यांच्या विहिरींचे पाणी आटले आहे. बहुळा धरणक्षेत्रात धरणातील पाणी आटल्यामुळे तिव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे

Web Title: marathi news jalgaon nandra tranker water cotton