चौपदरीकरणासाठी 69 कोटींची निविदा प्रसिद्ध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

जळगाव : शहरवासीयांचा पाठपुरावा आणि आंदोलनाच्या विविध टप्प्यांमधून वाट काढणाऱ्या शहरातील महामार्ग चौपदरीकरण व समांतर रस्त्यांच्या कामाला आज प्रत्यक्षात चालना मिळाली. या कामाच्या पहिल्या टप्प्यात महामार्ग चौपदरीकरणासाठी 69 कोटी 26 लाखांच्या कामाची निविदा आज राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. हे काम दीड वर्षात पूर्ण करायचे असून दहा वर्षांसाठी देखभाल-दुरुस्तीही मक्तेदाराकडे असेल. 

जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील प्रचंड वाढलेली वाहतूक व अपघातांचे प्रमाण लक्षात घेता या महामार्गाचे चौपदरीकरण व समांतर रस्त्यांची मागणी गेल्या काही दिवसांपासून तीव्रपणे होत होती. त्यासाठी कृती समिती स्थापन होऊन या समितीच्या माध्यमातून आंदोलनही झाले. "सकाळ'नेही जळगावकरांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. दरम्यान, महामार्ग चौपदरीकरणासह समांतर रस्त्यांच्या कामात महापालिका व "महावितरण'शी संबंधित जलवाहिनी, वीजखांब व तारांच्या स्थलांतराची अडचण होती. त्याचे सर्वेक्षण करून त्यासाठी महापालिका व "महावितरण'ने खर्चाचे अंदाजपत्रक करावे, असेही सूचित करण्यात आले. मात्र, महामार्ग चौपदरीकरणात कोणतीही अडचण नसल्याने लोकांच्या भावना लक्षात घेता चौपदरीकरणास प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणासाठी आज ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली. उद्या (20 डिसेंबर) निविदा ऑनलाइन दिसू शकेल. समांतररस्ते कृती समितीच्या संघर्षाला यानिमित्ताने पहिले यश प्राप्त झाले आहे. 

दीड वर्षात काम पूर्ण करावे लागणार 
69 कोटी 26 लाखांच्या निविदेनुसार कालंकामाता चौक ते आहुजानगर अशा 8 किलोमीटर टप्प्यात कोणती कामे अपेक्षित आहे, हे "सकाळ'ने आजच्याच (19 डिसेंबर) अंकात प्रसिद्ध केले आहे. निविदेत संबंधित मक्तेदारास हे काम दीड वर्षात पूर्ण करायचे असून दहा वर्षे देखभाल-दुरुस्तीही करायची असल्याचे नमूद आहे. ई-निविदा ऑनलाइन 20 डिसेंबरपासून उपलब्ध होत असून 31 जानेवारी 2019 पर्यंत स्वीकारण्यात येईल. 1 फेब्रुवारी 2019 ला निविदा उघडण्यात येतील. 

Web Title: marathi news jalgaon nation highway 4 way 69 carore