महामार्गासह राज्य मार्गांवर "चेक पोस्ट' नेमा : जिल्हाधिकाऱ्यांची सूचना 

avinash dhakane
avinash dhakane

जळगाव : अपघातांचे प्रमाण कमी व्हावे म्हणून रस्ते अपघातांमागील कारणांचा शोध घेऊन उपाययोजना करण्यासह उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) ठिकठिकाणी तपासणी नाके कार्यान्वीत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले. 
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा समिती बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता चंद्रकांत सिन्हा, हितेश अग्रवाल, रवींद्र सपकाळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील, महापालिकेचे शहर अभियंता सुनील भोळे, विद्युत विभागप्रमुख एस. एस. पाटील आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी म्हणाले, की अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा पाठलाग करताना अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. अशा परिस्थितीत संबंधित वाहनांचे क्रमांक घेऊन कार्यवाहीचे निर्देश द्यावेत. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ठिकठिकाणी तपासणी नाके कार्यान्वित करावेत. जेणेकरून अपघातांचे प्रमाण कमी होईल. 

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी समिती 
महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला गती द्यावी. महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवर गतिरोधक तयार करावेत. नागरिकांनीही स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा. त्याची सुरवात शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वत:पासून करावी. या निर्णयाची अंमलबजावणी पुढील आठवड्यापासून करावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. रस्ते अपघातांचे प्रमाण कमी होऊन अपघातग्रस्तांना तत्काळ दिलासा मिळण्यासाठी समन्वय समिती गठित करण्यात यावी. या समितीचे समन्वयक म्हणून उपप्रादेशिक कार्यालयातील सहाय्यक परिवहन अधिकारी काम पाहतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com