national science day विद्यार्थ्यांसह समाजाला "विज्ञान साक्षर' करण्याचा संकल्प

national science day
national science day

जळगाव : विज्ञान, तंत्रज्ञानाचा विचार केला तर गेल्या काही वर्षांत मोठा बदल झालेला दिसतोय. रोजच्या बदलांमुळे "आज आलेले नवे ते उद्या जुने' अशी स्थिती आहे. या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे सहज शक्‍य होत नाही. शालेय विद्यार्थ्यांना यात अधिक अपडेट राहणे महत्त्वाचे आहे. यामुळे त्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून देत अगदी शाळांमध्ये रोबोटीक कार्यशाळा घेत तांत्रिक ज्ञान देण्याचे काम सातपुडा इन्फोटेक करतेय.. तर बदलणाऱ्या विज्ञान- तंत्रज्ञानापासून दूर असलेल्या ग्रामीण भागासह सेवावस्तीतील मुले व नागरिकांना अपडेट करण्याचे काम कुतूहल फाउंडेशन करतेय.. समाज विज्ञान साक्षर करणारा या अनोख्या प्रयत्नाचा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने घेतलेला आढावा.. 

शालेय जीवनापासून "बेसिक मेकॅनिकल
विज्ञान- तंत्रज्ञानाबाबत भारत, जपान, चीन, अमेरिका या देशांच्या शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार व संशोधन, विकास या बाबींचा अभ्यास केल्यास भारतातील शिक्षण पद्धती आज ही परंपरागत आहे. या पद्धतीमुळे शाळा महाविद्यालयातील वातावरण हे भिन्न आहे. जगातील बाजारपेठ विद्यार्थ्यांकडे रोजगाराची संधी देताना प्रात्यक्षिक, पायाभूत सुविधा ग्राह्य धरून संधी देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या अनुषंगाने सातपुडा इन्फोटेक प्रा. ली. जळगावात काम करत आहे. शालेय विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे धडे देण्याचे काम करत आहे. भारतात संगणक, मोबाईल यावर गेम व सोशल मीडिया हाताळण्यातच आजचा विद्यार्थी गुंतला असून, ही युवापिढी चुकीच्या मार्गाने जात आहे. परंतु लहानपणापासून तंत्रज्ञानाशी जोडून पण नवीन काही कल्पना टाकून तंत्रज्ञानाचे शिक्षण सातपुडा इन्फोटेकमध्ये दिले जात आहे. यात प्रामुख्याने सातपुडा इन्फोटेकच्या माध्यमातून चौथी ते नववीच्या विद्यार्थांना बेसिक इलेक्‍ट्रॉनिक, बेसिक इलेक्‍ट्रिकल, बेसिक मेकॅनिकल व संगणकातील c language, c ++ language , paython आदी बाबी शिकवल्या जातात. म्हणजेच रोबोटिक्‍स आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या बाबींचे लहानपणापासून प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाते. 
 
विज्ञानाशी मुलांना लहानपणापासूनच जुळवून घेता यावे, त्यांना त्याचे प्राथमिक ज्ञान मिळावे; जेणेकरून भविष्यात स्वयंरोजगार तरी निर्माण करू शकेल. त्या दृष्टीने सातपुडा इन्फोटेक हे शालेय विद्यार्थ्यांकडून रोबोट निर्माण करण्याचे प्रशिक्षण देतो. शिवाय बेसिक मॅकेनिकल प्रशिक्षण देखील देत आहे. 
- रितेश पाटील, सीईओ, सातपुडा इन्फोटेक प्रा. लि. 

ग्रामीण, स्लम भागात पोहचविले विज्ञान 
बदलणाऱ्या तंत्रज्ञानापासून प्रामुख्याने ग्रामीण आणि झोपडपट्टीच्या भागातील मुले व त्यांचे पालक खूप मागे राहतात. त्यांना याचे ज्ञान देण्यासाठी कुतूहल फाउंडेशन गेल्या पंधरा वर्षांपासून "संडे सायन्स' हा उपक्रम राबवत आहे. आतापर्यंत पाच लाख जणांपर्यंत पोचून ज्ञान दिले आहे. यात विज्ञानातील प्रयोग जे रोजच्या जीवनात वापरले जातात; याची माहिती देतात. महिलांसाठी "किचन सायन्स' हा स्वयंपाक प्रयोगशाळा या उपक्रमातून स्वयंपाक खोलीत वापरले जाणारे केमिकलचे पदार्थ याचे ज्ञान देऊन चांगले पदार्थ खाण्याबाबत मार्गदर्शन. तसेच "ब्रेक अँण्ड मेक' हा उपक्रम लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत राबविला जातो. यात रोजच्या वापरातील इलेक्‍ट्रिकल व इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू देऊन ते संपूर्ण उघडण्यास लावणे आणि परत जोडण्याचे काम केले जाते. तर अठरा वर्षांपासून लहान मुलांसाठी "खेळण्यातून शिका विज्ञान' अशी खेळणी आहेत. ज्यामधून मुलांना खेळण्याचा आनंद आणि त्यातून विज्ञानाचे ज्ञान मिळत आहे. 
 
तंत्रज्ञान बदलत असते, पण या बदलणाऱ्या तंत्रज्ञानात मुले मोबाईलपुरते मर्यादित राहतात. परंतु त्याचे फायदे- तोटे याचे ज्ञान मुलांसोबत पालकांना व्हायला हवे यासाठी प्रॅक्‍टिकल सायन्स महत्त्वाचे आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून याची सुरवात करण्याच्या उद्देशाने शाळेत वेगवेगळे उपक्रम आणि संडे सायन्स हा उपक्रम कुतूहल फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्याचे काम करत आहे. 
- महेश गोरडे, संचालक, कुतूहल 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com