नाट्यगृह वापरासाठी आजपासून खुले करा : चंद्रकांत पाटील 

नाट्यगृह वापरासाठी आजपासून खुले करा : चंद्रकांत पाटील 

जळगाव ः अत्याधुनिक सोयीसुविधा असलेले वातानुकूलित बंदिस्त नाट्यगृह (ऑडिटोरियम) उद्यापासून (ता. 3) खुले करा, उद्‌घाटन नंतर मान्यवरांच्या हस्ते भविष्यात करू. मात्र त्यांचा उपभोग रसिकांसह, नाट्यकलावंतांना घेऊ द्या, असे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे जिल्हा प्रशासनाला दिले."सकाळ'ने आज "तीस कोटींच्या नाट्यगृहाला उद्‌घाटनाची प्रतीक्षा'- पालकमंत्र्यांना उद्‌घाटनाला वेळ नाही-रसिक कलावंतांची फरफट'- या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पालकमंत्र्यांनी वरील आदेश दिले आहेत. 
पालकमंत्री पाटील यांनी मुक्ताईनगर येथून आल्यानंतर अजिंठा विश्रामगृहात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात विविध विषयांच्या आढावा घेतला. त्यात मुख्यतः बंदिस्त नाट्यगृह, समांतर रस्ते, शिवाजीनगर उड्डाण पूल आदी विषय होते. 
 
उड्डाणपूल निविदेचे काम अंतिम टप्प्यात 
"सकाळ'ने बंदिस्त नाट्यगृहाच्या उभारणीपर्यंत सतत वृत्तांकन केले. यामुळे नाट्यगृह तयार झाले आहे. सोबतच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाला समांतर रस्ते हवे, शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम व्हावे, यासाठी सतत "सकाळ'ने बातम्यांच्या माध्यमातून पाठपुरावा केला. समांतर रस्ते नसल्याने होणारे अपघात. याची वस्तुस्थिती वेळोवेळी मांडली. यामुळेच पालकमंत्री यांनी शहरातील समांतर रस्त्यांची निविदा काढण्याचे काम येत्या 15 दिवसांत पूर्ण केली जाईल. शिवाजीनगर रेल्वे उड्डाण पुलाची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे पत्रकारांना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com