नवीन जलस्रोत शोधण्याचे महसूल अधिकाऱ्यांना आदेश 

नवीन जलस्रोत शोधण्याचे महसूल अधिकाऱ्यांना आदेश 

जळगाव ः जिल्ह्यात यंदा झालेल्या कमी पावसामुळे भूजलपातळी दिवसेंदिवस घटत आहे. विहिरींची पातळीही खालावत आहे. पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून जेथे विहिरी अधिग्रहित केल्या आहेत, त्यांचीही जलपातळी खालावत आहे. यामुळे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांना आपापल्या तालुक्‍यात नवीन जलस्रोत शोधून ते त्वरित जिल्हा प्रशासनाला कळवावेत, असे आदेश जिल्हा प्रशासनातर्फे काढण्यात आले आहेत. 
जिल्ह्यात 263 गावांतील 269 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यासह तात्पुरती पाणीपुरवठा योजना, नवीन विंधन विहिरी, नवीन कूपनलिका, विहीर खोलीकरण आदी कामेही सुरू आहेत. मात्र, अधिग्रहित केलेल्या विहिरींची पातळी अतितापमानाने आताच खालावत आहे. सर्वच विहिरी आटल्या तर नवीन विहीर शोधण्यास वेळ लागेल. नागरिकांना निर्धारित वेळेत पाणीपुरवठा करता येणार नाही. अशी स्थिती उद्‌भवू नये यासाठी सध्या जेथून पाणीपुरवठा होत आहे, त्याच परिसरात असलेल्या जुनी विहिरींसह कूपनलिका शोधून ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. त्या- त्या परिसरात सध्याच्या जलस्रोतांशिवाय किती विहिरी, कूपनलिकांवरून पर्यायी पाणीपुरवठा करू शकतो, याचीही माहिती मागविण्यात आली आहे. तो अहवाल त्वरित जिल्हा प्रशासनास सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. 
 
दृष्टिक्षेपात टंचाईची स्थिती.... 
- टॅंकरद्वारे पाणीपुरवठा होणारी गावे ः 172 
- टॅंकरची संख्या ः 154 
- अधिग्रहित विहिरी ः 269 
- तात्पुरत्या पाणी योजना ः 46 
- नवीन विंधन विहिरी ः 109 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com