सैन्य भरती फसवणुकीची व्याप्ती वाढली; परराज्यातील तक्रारदार महाराष्ट्रात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पाचोरा : सैन्य दलातील सुभेदारपदावर कार्यरत असलेला व राज्यभरात अनेक तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना कोट्यवधी रुपये गंडा घालणाऱ्या वाळकी (नगर) येथील हसनोद्दीन शेख याच्या विरोधात पाचोरा येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातील वृत्त 'ई सकाळ'मध्ये वाचून आंध्र प्रदेशमधील फसवणूक झालेले तक्रारदार पाचोरा येथे दाखल झाले आहेत.

ठकसेन हसनोद्दिन याने आंध्र प्रदेशातही लाखोंचा गंडा तरुणांना घातल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, सनोद्दीनच्या मालकीची आणखी एक कार तपास यंत्रणेने जप्त केली आहे. 

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील तरुणांना सैन्यदलात भरती करण्याचे आमिष दाखवून 8 तरुणांना 25 लाख 25 हजार रुपयांचा गंडा घातला असल्याची माहिती आंध्र प्रदेशमधील तक्रारदारांनी दिली आहे.

'ई सकाळ' वृत्त वाचून हे तक्रारदार पाचोरा पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे आंध्र प्रदेशात तेथील भाषेत तरुणांशी संवाद साधून नोकरीचे आमिष दाखवून त्यांना गंडविण्याचा प्रकार हसनोद्दीन शेख याने केला आहे. त्यामुळे या कारवाया महाराष्ट्रापुरत्या मर्यादित राहिल्या नसून, त्या आता देशव्यापी होण्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पोलिस निरीक्षक श्‍यामकांत सोमवंशी यांनी याच प्रकरणावर सध्या लक्ष केंद्रित केले आहे. तपास पथकाद्वारे कसून तपास केला जात आहे. या तपास पथकाने हसनोद्दीनच्या मालकीची mh12- 28 12 या क्रमांकाची एक कार जप्त केली आहे. त्यामुळे आतापर्यंत पोलिसांना दोन कार हाती लागल्या आहेत. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रातील आणखी काही तरुणांना हसनोद्दिनने आपले एजंटांमार्फत गंडविले असल्याचे बोलले जात आहे.

पाचोरा पोलिसांमध्ये तक्रारी मात्र संबंधितांकडून दाखल केल्या जात नसल्याने नेमके किती तरुणांना त्याने गंडविले आहे व रकमेचा आकडा नेमका किती आहे हे अद्याप पावेतो स्पष्ट झाले नसले, तरी हा आकडा सुमारे 25 कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्‍यता यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याची व रकमेची व्याप्ती पाहता हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा 'सीआयडी' पथकामार्फत त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

Web Title: marathi news jalgaon news Army Recruitment Scam Andhra Pradesh