लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक 

दीपक कच्छवा
रविवार, 4 मार्च 2018

कळमडु येथील दिपक मधुकर केदार (वय 24) हा सुशिक्षीत बेरोजगार तरुण बारावी उत्तीर्ण झालेला होता. यांने दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील कळमडु येथील संशयीत आरोपी सुधीर कैलास भिल्ल (सोनवणे) व त्याचे वडील कैलास उत्तम भिल्ल ( सोनवणे ) यांना साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांनी अटक केली.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : संपुर्ण राज्यभर बेरोजगार तरूणांना आसाम रायफल्स आर्मीमध्ये नोकरी लावून देण्याच्या अमिषाने कोट्यावधी रुपयाची फसवणूक झाल्याचे यापूर्वीच  उघडकीस आले आहे. रात्री मेहुणबारे पोलिसांनी कळमडु (ता. चाळीसगाव) येथील दोघा संशयितांना अटक केली. 

कळमडु येथील दिपक मधुकर केदार (वय 24) हा सुशिक्षीत बेरोजगार तरुण बारावी उत्तीर्ण झालेला होता. यांने दिलेल्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यातील कळमडु येथील संशयीत आरोपी सुधीर कैलास भिल्ल (सोनवणे) व त्याचे वडील कैलास उत्तम भिल्ल ( सोनवणे ) यांना साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हेमंत शिंदे यांनी अटक केली. मात्र यातील मुख्य सूत्रधार संजय अडकमल आद्यापही फरार आहे.

Web Title: Marathi news Jalgaon news cheating case