जिल्ह्यात सव्वा कोटीचा गंडा; तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

जळगाव - शहरातील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या नवी पेठ शाखेतून सहा ग्राहकांच्या खात्यातून ‘यूपीआय ॲप’चा गैरवापर करून ४९ लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या जितेंद्र मारुती रंधे (रा. चिखली, जि. बुलडाणा) याने जळगाव जिल्ह्यातून एक कोटी २८ लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले होते. पाळधी (ता. धरणगाव) शाखेतून ७३ लाख व मुक्ताईनगर शाखेतून ६ लाख रुपयांचा गंडा भामट्यांनी घातला आहे. या गुन्ह्यात शहर पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून, त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. 

दाखल गुन्ह्यात नमूद केल्याप्रमाणे, सिराजउद्दीन शफिउद्दीन सय्यद (रा. मेहरुण, जळगाव), शेख सलीम शेख मुर्तजा (रा. मेहरुण, जळगाव), शेहनाजबी जाकिर सय्यद (रा. आव्हाणे, ता.जळगाव), मुंताजीन सय्यद (रा. मास्टर कॉलनी, जळगाव), शफिउद्दीन करिमोद्दिन सय्यद (रा. मेहरुण, जळगाव) व रफिक शफियोद्दीन सय्यद (रा. मेहरुण, जळगाव) यांनी जळगाव शहरातील नवीपेठेतील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतून २७ डिसेंबर २०१६ ते १८ जानेवारी २०१७ या कालावधीत खाते उघडले. या ग्राहकांच्या खात्यावर पैसे नसताना यूपीआय ॲपचा वापर करून जितेंद्र मारुती रंधे, अता मोहम्मद खान, राजेंद्र भानुदास बारडे, विजय वसंतराव मुडकुले, गोपाळ गोविंदराव वानखेडे, सुनील केशवराव पंडागळे व राजेश जनार्दन बुडूखले यांच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यात ४८ लाख ९४ लाख ५८२ रुपये परस्पर वर्ग करून घेतले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बॅंकेच्या मुख्य व्यवस्थापिका छाया गिरीश भगुरकर (रा. मोहाडी रोड, जळगाव) यांनी १२ एप्रिल २०१७ ला शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून १३ जणांविरुद्ध फसवणूक व आयटी ॲक्‍टचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्यासह पथकाने ८ फेब्रुवारीला राजेश जनार्दन बडखुले (रा. निमगाव, नांदुरा ता. बुलडाणा) यास अटक केली होती, तो कोठडीत असून त्याच्या माहितीवरून सुनील केशव पडांगळे (वय-३८), गोपाल गोविंदराव वानखेडे (वय-४५,) या दोघांना अटक करून आज जिल्हा न्यायालयात न्या. व्ही. एच. खेडकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयात दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यावर दोघा संशयितांना १४ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत रवाना केले आहे.

‘बीट क्वाईन स्कीम’चे आमिष
या गुन्ह्याचा मास्टरमाईंड असलेला जितेंद्र रंधे हा सॉफ्टवेअर अभियंता आहे. ‘बीट क्वाईन स्कीम’ या योजनेचे आमिष दाखवून अता मोहमंद खान (रा. चिखली) या त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याने जळगावच्या सहा जणांना शून्य ‘बॅलेन्स’ने बॅंकेत खाते उघडायला लावले. जळगावचे सहा जण खान याचे जवळचे नातेवाईक आहेत. पैस मिळतील या आमिषाने या सर्वानी बॅंकेत खाते उघडले, नंतर हा गैरव्यवहाराचा प्रकार समोर आला होता.

Web Title: marathi news jalgaon news crime