चाळीसगावजवळ आढळला महिलेचा जळालेला मृतदेह

संजय ब्राह्मणकार
शनिवार, 3 मार्च 2018

खडकी बुद्रूक येथील वना कोळी हे नेहमी पहाटे फिरण्यासाठी जातात. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ते रस्त्याने फिरण्यासाठी जात असताना खडकी शिवारातील समाधान कोळी यांच्या शेतातील बांधावर कपाशीच्या काड्या जळताना त्यांना दिसल्या.

चाळीसगाव : खडकी बुद्रूक (ता. चाळीसगाव) गावापासून एक किलोमीटर अंतरावर नांदगाव रस्त्यावर एक शेताच्या बांधावर 14 ते 16 वर्षीय वयाचा जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. तो मृतदेह महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिस मृतदेहाची राख पोत्यात भरत असतांना त्यांना त्या ठिकाणी पायातले जोडवे मिळून आले, त्यामुळे मृतदेह महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

खडकी बुद्रूक (ता. चाळीसगाव) गावापासून एक किलोमीटर अंतरावर नांदगाव रस्त्यावर एक शेताच्या बांधावर 14 ते 16 वर्षीय वयाचा जळालेला मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेहाजवळ स्कार्फ मिळून आल्याने हा मृतदेह मुलीचा असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. मृतदेहाचा केवळ सापळाच शिल्लक असल्याने ओळख पटविणे कठीण आहे. 

याबाबत माहिती अशी, खडकी बुद्रूक येथील वना कोळी हे नेहमी पहाटे फिरण्यासाठी जातात. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ते रस्त्याने फिरण्यासाठी जात असताना खडकी शिवारातील समाधान कोळी यांच्या शेतातील बांधावर कपाशीच्या काड्या जळताना त्यांना दिसल्या. एवढ्या सकाळी काड्या कोणी पेटवल्या म्हणून वना कोळी हे बांधाजवळ आले असता, त्यांना मृतदेह जळताना दिसून आला. त्यांनी या घटनेची माहिती लगेचच गावात कळवली. त्यानुसार पोलिस पाटील विनायक मांडोळे यांनी पोलिसांना सांगितल्यानंतर काही वेळातच अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलिस अधिकारी अरविंद पाटील, पोलिस निरीक्षक रामेश्वर गाढे पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

मृतदेह पूर्णपणे जळालेला असल्याने तो नेमका मुलाचा की मुलीचा हे समजणे कठीण आहे. मृतदेहाजवळच स्कार्फ व रिक्षाचे टायर आढळून आले. सध्या तरी हा मृतदेह मुलीचा असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, पोलिसांनी मात्र "डी. एन. ए.' चाचणी करुनच मृतदेह मुलाचा की मुलीचा हे सांगता येईल असे सांगितले. पोलिसांनी परिसरात तपास सुरु केला आहे. 

Web Title: Marathi news Jalgaon news dead body found