'गिरणा'तून रब्बीसाठी दुसरे आवर्तन

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 18 जानेवारी 2018

गिरणा धरणातून रब्बीच्या सिंचनसाठी दोन आवर्तने ठरली होती. त्यापैकी पहिले आवर्तन आठ डिसेंबरला सोडले होते. ते महिनाभर सुरु होते. त्यानंतर बुधवारी(ता. 16) सायंकाळी सिंचनासाठीचे दुसरे व आवर्तन सोडण्यात आले. 

पिलखोड (ता. चाळीसगाव) : गिरणा धरणातून सिंचनासाठीचे दुसरे आवर्तन बुधवारी(ता. 16) सायंकाळी सोडण्यात आले, अशी माहिती धरणाचे शाखा अभियंता एस. आर. पाटील यांनी 'सकाळ'ला दिली.

गिरणा धरणातून रब्बीच्या सिंचनसाठी दोन आवर्तने ठरली होती. त्यापैकी पहिले आवर्तन आठ डिसेंबरला सोडले होते. ते महिनाभर सुरु होते. त्यानंतर बुधवारी(ता. 16) सायंकाळी सिंचनासाठीचे दुसरे व आवर्तन सोडण्यात आले. 

धरणातून 1 हजार 150 क्युसेक एवढे आवर्तन सोडले आहे. आवर्तन सोडल्यानंतर जामदा उजवा, जामदा डावा, निम्न गिरणा या कालव्यांना पाणी सोडण्यात आले आहे. सिंचनासाठीचे हे दुसरे आवर्तनही महिनाभर सुरु राहणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी पाण्याचा योग्य व जपून वापर करावा, असे आवाहन  उपअभियंता हेमंतकुमार बेहरे यांनी केले आहे.

Web Title: Marathi news Jalgaon news Girna dam