अखेर पन्नास दिवसांनंतर व्यवस्थापकासह तिघांना अटक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

जळगाव - येथील औद्योगिक वसाहत परिसरातील गीतांजली केमिकल्समध्ये ७ जानेवारीला झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. औद्योगिक वसाहत पोलिसांत दाखल सदोष मनुष्यवधाच्या या गुन्ह्यात तब्बल पन्नास दिवसांनंतर तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात फॅक्‍टरी मॅनेजर, प्रॉडक्‍शन मॅनेजर, नाईट मॅनेजर अशा तिघा संशयितांना अटक करण्यात येऊन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना एका दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहे.

जळगाव - येथील औद्योगिक वसाहत परिसरातील गीतांजली केमिकल्समध्ये ७ जानेवारीला झालेल्या स्फोटात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. औद्योगिक वसाहत पोलिसांत दाखल सदोष मनुष्यवधाच्या या गुन्ह्यात तब्बल पन्नास दिवसांनंतर तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यात फॅक्‍टरी मॅनेजर, प्रॉडक्‍शन मॅनेजर, नाईट मॅनेजर अशा तिघा संशयितांना अटक करण्यात येऊन न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिघांना एका दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, स्फोटामागचे नेमके कारण काय, त्यात कुणाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे, त्यासंबंधी जबाबदारी कुणाची अशा विविध मुद्यांवर संशयितांची चौकशी होणार आहे. 

गीतांजली केमिकल्स या कंपनीतील स्फोटानंतर जखमींपैकी कोणीही तक्रार देण्यास पुढे न आल्याने सहाय्यक निरीक्षक समाधान पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. गुन्ह्यात कंपनी संचालक आणि व्यवस्थापन मंडळातील जबाबदार म्हणून संशयित जितेंद्र यशवंत पाटील, डी. डी. इंगळे, श्रीकांत काबरा, सुरेंद्र कुमार मोहता, मधू सुरेंद्र मोहता, पवनकुमार देवरा आदी सहा संशयितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याच्या तपासाधिकारी डीवायएसपी सचिन सांगळे यांना आवश्‍यक कंपनीचे दस्तऐवज, पुरावे आणि गुन्ह्यात समाविष्ट संशयितांवर जबाबदारी निश्‍चित करणाऱ्या यंत्रणांचा अहवाल अपेक्षित होता.

त्यानुसार तयारी पूर्ण होऊन गुन्ह्यात कारखाना व्यवस्थापक जितेंद्र यशवंत पाटील (वय-४९, रा.चंद्रप्रभा कॉलनी, जळगाव), दिलीप दयाराम इंगळे (वय-५३, निर्मिती व्यवस्थापक), श्रीकांत कांतिलाल काबरा (वय-४६, रात्रपाळी व्यवस्थापक) या तिघांना अटक करून न्या. बी. डी. गोरे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने संशयितांना एक दिवस पोलिस कोठडीत पाठवण्याचे आदेशित केले आहे.

आठपैकी पाच जणांचा मृत्यू 
या स्फोटात आठ कामगार गंभीर जखमी झाले होते. स्फोटातील जखमींवर सुरवातीला शहरातील वेगवेगळ्या तीन रुग्णालयांत उपचार करण्यात आले. त्यातील अत्यवस्थ पाच जणांना उपचारार्थ मुंबईला हलविण्यात आले. त्यापैकी गणेश बन्सीलाल साळी (वय ३८), ज्ञानेश्‍वर उखर्डू पाटील (वय ३०), योगेश प्रकाश नारखेडे (वय २६), नीलेश कोळी (वय २७) आणि धनराज शालिक ढाके (वय ४६) या पाच कामगारांचा मृत्यू झाला, तर उर्वरित तिघांवर अजूनही उपचार सुरू आहेत. 

निष्काळजीपणासह जबाबदारीबाबत चौकशी
तपासाधिकारी सचिन सांगळे यांच्यातर्फे सादर अहवालानुसार संशयितांसाठी पाच दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. गुन्ह्याचा प्रकार आणि रासायनिक प्रयोगशाळांचे तसेच वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या अहवालासह स्फोट घडण्यास मनुष्यनिर्मित कारणांचा शोध घेतला जाणार असून नेमक्‍या कोणाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडून पाच कामगारांना प्राणास मुकावे लागले या दृष्टीने अटकेतील संशयितांची चौकशी होणार आहे.

Web Title: marathi news jalgaon news gitanjali chemicals blast crime