बिबट्याला ठार करायचे नाही का?

शिवनंदन बाविस्कर
बुधवार, 6 डिसेंबर 2017

बिबट्या दिसला; ठिकाण माहित नाही?
ज्या भागात बिबट्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला. त्यासंदर्भात उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांना विचारले असता, त्यांनी सदर घटनेबाबत सारवासारव केली. गुप्त माहिती म्हणुन त्यांनी तो प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला. ज्या भागात बिबट्याची दहशत आहे. त्याच भागात तो दिसल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याच्या संदर्भात सर्वच माहीती अधिकारी गुप्त ठेवत आहे. मात्र बिबट्या ट्रॅप झाल्याचा फोटो इतरांकडे कसा गेला? हेही अधिकाऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे बिबट्या ट्रॅप झाला पण ठिकाण माहीत नाही असेच श्री. रेड्डी यांच्या बोलण्यावरुन जाणवले.

पिलखोड (ता. चाळीसगाव) : बिबट्याला ठार करण्यासाठी वन विभाग गेल्या काही दिवसांपासून वरखेडे व पिंपळवाड म्हाळसा शिवारात ठाण मांडुन आहे. याच भागात काही दिवसांपुर्वी बिबट्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला होता. वन कर्मचाऱ्यांना रात्रभर गस्त घालुनही बिबट्या दिसला नसेल का? की वन विभागाला बिबट्याला ठार करायचे नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. 

सोमवारी(ता. 4) सायंकाळी दरेगाव शिवारात दादा सोनवणे या दहा वर्षीय मुलावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. परंतु वडीलांमुळे मुलाचे प्राण वाचले. या घटनेमुळे पुन्हा मुलांसह शेतकऱ्यांच्या जीवीतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक दिवसांपासून शिकार न केलेल्या बिबट्याने काल(ता. 4) शिकार करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र, तो शेतकरी व शेतमजुरांच्या सतर्कतेमुळे फोल ठरला. वन विभागाची एवढी मोठी टीम असुनही हल्ले रोखण्यात अपयशी ठरत असल्याने ग्रामस्थ कमालीचे हैराण झाले आहेत. 

काही दिवसांपुर्वी बिबट्या वरखेडे व पिंपळवाड म्हाळसा शिवारात ट्रॅप झाल्याचे वृत्त होते. बिबट्याच्या हल्ल्यांचे केंद्रबिंदु म्हणुन वरखेडे हे सध्या वन विभागाच्या रडारवर आहे. त्यामुळे वन अधिकारी व कर्मचारी याच भागात मोठ्या प्रमाणावर दिसतात. वेगवेगळी पथके शार्प शुटरांसह रात्री गस्त घालतात. ज्या भागात बिबट्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला. त्या भागात कुठलेच पथक तैनात नव्हते का? की बिबट्या दिसुनही वन विभागाला बिबट्याला ठार करायचे नव्हते? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

बिबट्या दिसला; ठिकाण माहित नाही?
ज्या भागात बिबट्या कॅमेऱ्यात ट्रॅप झाला. त्यासंदर्भात उपवनसंरक्षक आदर्शकुमार रेड्डी यांना विचारले असता, त्यांनी सदर घटनेबाबत सारवासारव केली. गुप्त माहिती म्हणुन त्यांनी तो प्रकार लपविण्याचा प्रयत्न केला. ज्या भागात बिबट्याची दहशत आहे. त्याच भागात तो दिसल्याचे त्यांनी सांगितले. बिबट्याच्या संदर्भात सर्वच माहीती अधिकारी गुप्त ठेवत आहे. मात्र बिबट्या ट्रॅप झाल्याचा फोटो इतरांकडे कसा गेला? हेही अधिकाऱ्यांना माहिती नाही. त्यामुळे बिबट्या ट्रॅप झाला पण ठिकाण माहीत नाही असेच श्री. रेड्डी यांच्या बोलण्यावरुन जाणवले.

Web Title: marathi news jalgaon news leopard attack