मुलींसह पालकांच्या हट्टामुळे मुलांचे विवाह जुळणे कठीण

दीपक कच्छवा
बुधवार, 7 मार्च 2018

सोशल मिडीयाचाही वापर
आता लग्नाचे बायोडाटा टाकण्यासाठी बहुतेक समाजाचे वधु वर परीचय ग्रुप तयार केले आहेत.त्या ग्रुप समाजातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ जोडला गेला आहे.त्या ग्रुपवर वधु वरचे परिचयपत्र टाकण्यात येतात त्यामुळे विवाह जमविण्यासाठी सोशल मिडीयाचा असाही वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक कानाकोपर्यात विवाहयोग्य असलेल्या तरूण तरूणीचे माहीती लगेच मिळत आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया देखील विवाह जमविण्यासाठी महत्वाचे ठरले आहे.

मेहुणबारे( ता.चाळीसगाव) : गरीब असो की श्रीमंत; प्रत्येकाला वाटते की आपल्या मुलीला नोकरी करणाराच 'वर' मुलगा मिळायला हवा. आशी आशा प्रत्येकालाच असते. सुशिक्षित बेरोजगार मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.विवाहइच्छुक युवकांचे नोकरी अभावी विवाह होत नसल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत.त्यामुळे लग्न जमविणार्या संस्थासह मध्यस्थांकडे परिचयपत्र मोठ्या प्रमाणावर जमा होत असल्याचे चित्र दिसत आहे.

मुलींना अपेक्षित असलेला शासकीय व निमशासकीय नोकरी करणाऱ्या मुलांचे स्थळ पाहीजे तेवढ्या प्रमाणात येत नसल्याने मुलींची लग्ने थांबली आहेत.तर दुसरीकडे मुलींचे वाढत्या वयामुळे पालकही चिंताग्रस्त झाले आहेत.प्रत्येक समाजात वधूवर निवडीसाठी मेळावे घेतली जात आहेत.तरीही मात्र वेगळीच वस्तुस्थी पहायला मिळते.काही तरून पदवीधर असुनही नोकरी अभावी बेरोजगार आहेत.विविध व्यवसाय व शेती करणाऱ्या विवाह जुळणे खुपच अडचणीचे  झाले आहे.सर्व परिस्थिती लक्षात घेता समाजातील विवाह जोडणाऱ्या मध्यस्थीकडे बायोडाटा मोठ्या प्रमाणावर जमा होत आहे.

ग्रामीण भागात नावे नोंदणी
पुर्वी फक्त शहरात असलेली सूचक मंडळात नाव नोदण्यांची पध्दत आता ग्रामीण भागात देखील उपलब्ध झाली आहे.पंधरा वर्षापुर्वी उपवर मुला मुलींचे विवाह जमवितांना फारशा अडचणी येत नव्हत्या मात्र आता  मुलांच्या घरची परिस्थिती, त्यांचा स्वभाव शेती उद्योग, नोकरीचा प्राधान्याने केला जात आहे.दरम्यान काही वर्षात गर्भलिंग चिक्तसेचा सुळसुळाट झाला आहे.त्यामुळे मुलांच्या प्रमाणात मुलींची संख्या दिवसे दिवस कमी होत असल्याने मुलांना लग्नासाठी मुले भेटणे अवघड झाले आहे.

सोशल मिडीयाचाही वापर
आता लग्नाचे बायोडाटा टाकण्यासाठी बहुतेक समाजाचे वधु वर परीचय ग्रुप तयार केले आहेत.त्या ग्रुप समाजातील प्रत्येक गावातील ग्रामस्थ जोडला गेला आहे.त्या ग्रुपवर वधु वरचे परिचयपत्र टाकण्यात येतात त्यामुळे विवाह जमविण्यासाठी सोशल मिडीयाचा असाही वापर केला जात आहे. त्यामुळे प्रत्येक कानाकोपर्यात विवाहयोग्य असलेल्या तरूण तरूणीचे माहीती लगेच मिळत आहे. त्यामुळे आता सोशल मीडिया देखील विवाह जमविण्यासाठी महत्वाचे ठरले आहे.

फसवणुकीचे प्रकार वाढले
काही समाजामध्ये मुलांना  समाजामधील अनुरूप जोडीदार मिळत नसल्याने  बहुतांश पालक दुसर्‍या समाजातील मुलीशी पैसे देवुन लग्न करून आणत आहेत.मात्र यात चाळीसगाव तालुक्यात काही गावामध्ये अक्षरश फसवणूक झाल्याचे प्रकार देखील उघडकीस आले  आहेत.त्यामुळे आता मुलाची चिंता पालकांना भेडसावत असल्याचे चित्र दिसत आहे.

Web Title: Marathi news jalgaon news marriage and demands