निवडणूक विभागाकडून प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

जळगाव - महापालिकेची आगामी निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना, आरक्षण सोडत आणि सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना निश्‍चित करण्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार १४ फेब्रुवारीपासून या प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेची १९ सप्टेंबर २०१८ ला मुदत संपणार आहे. त्याअनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचना निश्‍चित करण्याचे आदेश महानगरपालिकेला पत्रकाद्वारे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या २०१३ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ३७ प्रभाग तयार करण्यात आले होते. त्यात ३६ प्रभागांमध्ये दोन नगरसेवक तर एका प्रभागांत तीन नगरसेवक अशी रचना तयार केली होती. आता आगामी निवडणुकीसाठी एका प्रभागात चार सदस्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे आता १९  प्रभाग होण्याची शक्‍यता असून यासाठी प्रभाग रचना, आरक्षण सोडत, त्यावरील हरकती, सुनावणी आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचा कार्यक्रम निवडणूक विभागाने घोषित केला आहे.

Web Title: marathi news jalgaon news municipal election department ward structure