गाळेधारकांनो, तक्रार कायम ठेवून थकीत रक्कम भरा - भगत बालाणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

जळगाव - महापालिकेतर्फे गेल्या काही दिवसांपासून गाळेधारकांना थकीत बिल वाटप करून रक्कम वसुली सुरू आहे. गाळेधारकांनी तक्रार कायम ठेवून थकीत रक्कम भरावी, कोणत्याही दिशाभूल करणाऱ्यांना बळी पडू नये, असे आवाहन माजी नगरसेवक भगत बालाणी यांनी केले आहे.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे, की महापालिका व्यापारी संकुलांतील गाळेधारकांच्या बैठका घेऊन काही लोक दिशाभूल करीत आहेत. त्यांना थकबाकीची रक्कम न भरण्याचा सल्ला देत आहेत. परंतु गाळेधारकांनी अशा लोकांना बळी पडू नये. आपली तक्रार कायम ठेवून थकबाकीचा भरणा करण्याचा महापालिकेत सोपस्कर करावा. राज्य शासन व महापालिकेचे प्रभारी आयुक्त यांनी सकारात्मक पाऊल उचलले आहे. त्यामुळे आता महापालिका थकबाकीची रक्कम स्वीकारत आहे. त्याचा फायदा गाळेधारकांनी घ्यावा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, भाजप नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व आमदार, खासदार, जिल्हाधिकारी व महापालिकेचे प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर हे गाळ्यांबाबत लवकरात लवकर मार्ग काढतील. शासनही गाळेधारकांचे हित लक्षात घेऊन काम करणार आहे. त्यामुळे गाळेधारकांनी आपापली थकबाकीची रक्कम भरावी.

Web Title: marathi news jalgaon news municipal shops arrears bhagat balani