शिवकॉलनीत मुख्य रस्त्यावर घरफोडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

जळगाव - येथील शिवकॉलनीत मुख्य रस्त्यावरील बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटातील मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत भाड्याने राहणाऱ्या विद्यार्थिनीच्या बॅगेतूनही रोकड चोरून नेली. शुक्रवार ते रविवार सलग सुटी असल्याने नोकरदार, वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी घराकडे धाव घेतल्याने बंद घराकडे लक्ष ठेवून चोरट्यांनी घरफोडी करीत ऐवज लांबविला.

शिवकॉलनीतील गट नं. ६० मधील प्लॉट नं ३/२ मध्ये शासकीय अभियात्रिकी महाविद्यालयातील लिपिक साहेबराव नारायण पाटील कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलीचा विवाह असल्याने सर्व कुटुंबीय २४ जानेवारीपासून वढोदा (ता. चोपडा) येथे गेल्याने घर बंद होते. या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत तीन विद्यार्थिनी भाड्याने राहतात. प्रसात्ताकदिनाची तसेच शनिवारी व रविवारी त्यांना सुटी असल्याने तिघापैकी दोन विद्यार्थिनी आपल्या गावी गेल्या, तर स्वाती पाटील ही विद्यार्थिनी याच परिसरात राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीच्या घरी रात्री थांबली. आज सकाळी स्वाती खोलीकडे परतली असता तिला खोलीच्या दरवाजाचे कुलूप उघडे दिसले. तसेच खोलीतील चारही विद्यार्थिनींच्या बॅगांची कुलपे तोडलेली आढळून आली. त्यानंतर खालच्या मजल्यातील खोलीमालकांच्या घराचा कडीकोयंडा तोडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे स्वातीने घराशेजारील रहिवासी प्रमोद पाटील यांना बोलावून घटनेची माहिती दिली.

पोलिसांची घटनास्थळी धाव
शिवकॉलनीतील रहिवासी प्रमोद पाटील यांनी नगरसेवक नितीन नन्नवरेंना या प्रकाराची माहिती कळविली. त्यानंतर नन्नवरे यांनी रामानंदनगर पोलिसांना माहिती दिली. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली. चोरट्यांनी मुख्य दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून आतील कपाटाचे लॉक तोडले असून, सर्व वस्तू अस्ताव्यस्त फेकलेल्या होत्या. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या विद्यार्थिंनींपैकी गायत्री पाटील यांच्या बॅगेतून ४५० रुपये चोरट्यांनी लंपास केले. मात्र, साहेबराव पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी नेमके काय नेले याची माहिती पाटील कुटुंबीय परतल्यावरच मिळणार असल्याने पोलिसांनी गुन्हा नोंदविलेला नाही.

Web Title: marathi news jalgaon news robbery theft crime