माजी विद्यार्थ्यांनी दिला शाळेला 'वॉटर कुलर' भेट!

शिवनंदन बाविस्कर
गुरुवार, 8 मार्च 2018

विद्यालयाला काहितरी देण्याच्या भावनेतून बेलगंगा विद्यालयाच्या 1996-97 बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक हजार रुपये जमा करत पंचवीस हजार किमतीचे 'वॉटर कुलर' भेट दिले. बेलगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. सी. पाटील यांच्याकडे  वॉटर कुलर सुपुर्द केले. 

पिलखोड (ता. चाळीसगाव) : तब्बल वीस वर्षानंतर व्हॉट्सऍपमुळे बेलगंगा टेक्निकल विद्यालयातील 1996-97 च्या दहावीच्या बॅचचे विद्यार्थी 'गेट टुगेदर'मुळे एकत्र आले. त्यावेळी ठरवल्यानुसार विद्यालयाकडे नुकतेच 'वॉटर कुलर' सुपुर्द केले. यामुळे विद्यार्थ्यांना ऐन उन्हाळ्यात थंडगार पाणी मिळणार आहे.   

विद्यालयाला काहितरी देण्याच्या भावनेतून बेलगंगा विद्यालयाच्या 1996-97 बॅचच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक हजार रुपये जमा करत पंचवीस हजार किमतीचे 'वॉटर कुलर' भेट दिले. बेलगंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. सी. पाटील यांच्याकडे  वॉटर कुलर सुपुर्द केले. 

यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. माजी विद्यार्थी प्रदीप पाटील यांनी महत्वाची भुमिका बजावत सर्व विद्यार्थ्यांशी समन्वय साधला.

Web Title: Marathi news Jalgaon news social work