मुर्ती विक्रीतून दीपक राठोड यांची गुजराण

दीपक कच्छवा
रविवार, 11 मार्च 2018

मुर्ती तयार करून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या  मोबदल्यात आमच्या कुटुंबींयांची गुजराण होते. वयोवृद्ध आई आजही दगडापासुन वऱ्हाटा पाटा तयार करण्यासाठी मदत होते. आईची व पत्नीची ही मदत मला पाठबळ देणारी ठरली आहे.
- दिपक राठोड (मुर्तीकार राजस्थान)

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर' या बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचा प्रत्यय जणु   राजस्थान येथुन पोटाची खळगी भरण्यासाठी मेहुणबारे (ता.चाळीसगाव) येथे आलेल्या दिपक राठोड व त्यांच्या कुटंबीयाच्या कष्टातुन दिसुन येत आहे.दगडाला आकार देवुन त्यापासून मूर्ती तयार करून हे कुटुंबीय उन्हाचे चटके सोसत संसाराचा गाडा ओढत आहे.

येथील जामदा फाट्यावर  दिपक राठोड यांनी मूर्ती तयार करून विकत आहेत. यापुर्वी ते आपल्या  मामाकडे रोजंदारीवर काम करून मूर्ती तयार करायचे.  मामाचे निधन झाल्यानंतर दिपकला पाहीजे तसे काम मिळतनव्हते. त्यामुळे त्यांनी स्वताच हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. .

रस्त्यावर थाटले दुकान
दिपक राठोड यांनी देवाच्या मूर्ती बनविण्यासाठी वेगवेगळ्या  प्रकाराची चार  दगड राजस्थान मधुन खरेदी केले आहेत. कुरंगी, काळा दगड, मार्बल, काळा मार्बल या दगडाचा वापर करून ते मुर्ती तयार करतात.येथील  जामदा फाट्यावर रस्त्यावरच छोटीशी ताडपत्री टाकून आपले मूर्ती बनविण्याचे दुकान थाटले आहे. त्या ठिकाणी त्यांना सुरवातीला खुपच आडचणीचा सामना करावा लागला.मात्र त्यावर मात करून दिपकने  येथे मुर्ती तयार  करण्याचे  काम सुरू केले. या कामासाठी त्यांना त्यांची  पत्नी कविता यांची मोलाची मदत होते.  त्यांना तीन मुली,एक मुलगा, व वयोवृद्ध आई आहे. दिपक राठोड हे बारा फुटपर्यंत मुर्ती तयार करतात.साधारण दोन हजारापासून ते पंचवीस हजारापर्यंत मूर्ती ते छनी हातोड्याचा वापर करून तयार करतात.मुर्तीना अकर्षनपणा येण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करतात. ज्यामुळे मूर्ती चांगली होऊन  त्याचा मोबदलाही त्यांना चांगला मिळतो. 

मुर्ती तयार करून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या  मोबदल्यात आमच्या कुटुंबींयांची गुजराण होते. वयोवृद्ध आई आजही दगडापासुन वऱ्हाटा पाटा तयार करण्यासाठी मदत होते. आईची व पत्नीची ही मदत मला पाठबळ देणारी ठरली आहे.
- दिपक राठोड (मुर्तीकार राजस्थान)

Web Title: Marathi news Jalgaon news statue social