चाळीसगाव: सोन्याची पोत चोरणारे तिघे जेरबंद

crime
crime

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी  पैसे नसल्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरण्याचा अजब फंडा वापरणाऱ्या तिघा तरूणांना मेहुणबारे पोलिसांनी आज जेरबंद केले आहे. यातील दोन बारावीचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना चिंचगव्हाण (ता.चाळीसगाव) येथे घडली.

चिंचगव्हाण (ता.चाळीसगाव) येथील रहिवासी जयराम निकम यांच्या मुलीचा साखरपुड्याचा कार्यक्रम होता. कार्यक्रम आटोपून बरीचशी नातेवाई  आपल्या गावाकडे जात होती.काल दि.27 रोजी  दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास गावातील माध्यमिक विद्यालयाच्या गेट समोर जयराम निकम यांची भाची आशाबाई पाटील( रा. तांबोळेनगर ता चाळीसगाव) देखील उभ्या होत्या.त्याचदरम्यान चिंचगव्हाण फाट्याकडुण एका दुचाकीवरून तीन मुले अतिशय भरधाव वेगात आली.त्याच्यातील मागे बसलेल्याने आशाबाई यांच्या गळ्यातील पाच ग्रॅमची पोत ओरबडुन नेली व लोंढे गावाकडे पळून गेले.त्यावेळी आशाबाई यांनी जोरजोरात आरडाओरडा केली.लगेचच काही ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला.केला तर काहीनी लोंढे गावातील ग्रामस्थांना हा प्रकार फोनवर सांगुन तुमच्या गावाकडे येत असलेल्याला तिघा  तरूणांना पकडून ठेवा.यांचा पाठलाग करत चिंचगव्हाणचे ग्रामस्थ लोंढे गावात पोहोचले तेथे या तिघा भामट्यांना ग्रामस्थांनी पकडून ठेवले.या घटनेची माहिती तात्काळ मेहुणबारे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप शिरसाठ यांना कळविताच त्यांनी तातडीने पोलिसांना घटनास्थळी पाठवले.

पोलिसांनी घेतली झाडाझडती 
या तिघा तरूणांना लोंढे येथील ग्रामस्थांनी पकडुन ठेवले होते. मेहुणबारे पोलिसांनी या तिघांची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे चिंचगव्हाण येथुन गळ्यातील चोरलेली पोत आढळून आली.पोत चोरणारे तिघेही तरूण धुळे येथील रहिवाशी आहेत.यात पवन हिरामण मोरे ( वय 19) राहणार शनिनगर मोगलाई धुळे, आकाश दगडु पवार ( वय 19 ) राहणार श्रीरामनगर शासकीय दुधडेअरी मागे धुळे, जयेश कैलास मोरे ( 19) मोतीनगर सेवा हाॅस्पीटलच्या मागे धुळे या तिघाजवळ महागडी साधारण एक लाख रूपये किमतीची दुचाकी क्रमांक mh.18 BB 2157 ही पोलिसांनी जप्त केली.ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अरविंद पाटील , यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिरसाठ, उपनिरीक्षक नाजिम शेख, हेमंत शिंदे व पोलिस कर्मचारी यांनी केली.या प्रकरणी जयराम निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा तरूणाच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयीतांचा आज बारावीचा पेपर आहे
धुमस्टाईलने गळ्यातील सोन्याची पोत चोरणाऱ्या या तिघा तरूणांपैकी दोन तरून बारावीची परिक्षा देत असल्याचे संशयित पोत चोरणाऱ्या तरूण पोलिसांना सांगत होते.काका अम्हाला जावु द्या उद्या अमचा पेपर आहे आशी विनवण्या ते करत होते.त्यामुळे हे विद्यार्थी असल्याचे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com