वितरकांना पाणी न दिल्याने पाटबंधारे अधिकाऱ्यांना घेराव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

येथील संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी परदेशी यांना घेराव घालून याबाबत जाब विचारला. तसेच क्रमाक २९ चारीचा कार्यक्रम पूर्वनियोजित असताना ३३ नंतर असल्याने ती देखील होऊन गेली. तुम्ही जर मागच्या आधी काढत असेल तर कसे नियोजन केले ? वरिष्ठ अधिकारी आमच्या फोनला जुमानत नाही. पाण्यासाठी तुरुंगाची शिक्षा मिळाली तरी चालेल पण पाणी मिळाले पाहिजे. शंभर टक्के धरणे भरलेली असताना पाणी आवश्यक वाटप केले जात नाही. 

येवला : हक्काच्या पाण्यासाठी भांडण्याची वेळ पश्चिम भागातील शेतकऱ्यांवर आल्याने पाटबंधारे विभागाच्या विरोधात शेतकरी आक्रमक होत आहेत. शनिवारी (ता.२४) पाणी मिळेल असे जळगाव नेऊर येथे चारी क्र.२८ व २९ वरील शेतकऱ्यांना देऊनही ते आश्वासन पाटबंधारे विभागाचे उपअभियंता वैभव भागवत यांनी पाळले नाही. त्यामुळे जळगाव नेउर येथील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी परदेशी यांना सोमवारी (ता.२६) घेराव घातला. 

चारी क्रमांक २८ व २९ वरील जय बजरंग पाणी वापर संस्था, माधवराव पाटील पाणी वापर संस्था, चारणबाबा पाणी वापर संस्था, सप्तश्रृंगी पाणी वापर संस्था,पांडुरंग पाणी वापर संस्था, मतोबा पाणी वापर संस्था, रघुनाथ पंढरीनाथ पाणी वापर संस्था, मानोरी पाणी वापर संस्था, मौनगिरी पाणी वापर संस्था, भागीरथा पाणी वापर संस्था, सदगुरू पाणी वापर पाणी वापर संस्था पाण्याच्या प्रतिक्षेत आहे.

येथील संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी परदेशी यांना घेराव घालून याबाबत जाब विचारला. तसेच क्रमाक २९ चारीचा कार्यक्रम पूर्वनियोजित असताना ३३ नंतर असल्याने ती देखील होऊन गेली. तुम्ही जर मागच्या आधी काढत असेल तर कसे नियोजन केले ? वरिष्ठ अधिकारी आमच्या फोनला जुमानत नाही. पाण्यासाठी तुरुंगाची शिक्षा मिळाली तरी चालेल पण पाणी मिळाले पाहिजे. शंभर टक्के धरणे भरलेली असताना पाणी आवश्यक वाटप केले जात नाही. 

त्यानंतर शनिवारी (दि.२४) पाणी दिले जाईल, असे आश्वासन पाटबंधारे विभागाचे अधिकारी भागवत यांनी दिले होते. मात्र, सोमवार (दि.२६) आला तरी अद्याप पाणी मिळाले नाही, ही शोकांतिका आहे.

पाण्याबाबत खालीवर करून शेतकऱ्यांचा अंत पाहू नका. नियोजनानुसार पाणी सोडले असते तर दिलासा मिळाला असता. नियोजन शून्य कारभारामुळे पाण्याअभावी पिके हातातून निघून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
 
Web Title: Marathi News Jalgaon News Water Distribution Irrigation Officials Gherao