सावित्रीबाई फुले पुरस्काराने १६ महिलांचा गौरव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

जळगाव - स्फूर्ती बहुद्देशीय संस्था व आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा आज झाला. यात विविध क्षेत्रांतील १६ महिलांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

जळगाव - स्फूर्ती बहुद्देशीय संस्था व आमदार राजूमामा भोळे यांच्यातर्फे महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार वितरण सोहळा आज झाला. यात विविध क्षेत्रांतील १६ महिलांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रम सत्यवल्लभ सभागृहात आज झाला. कार्यक्रमाला रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. प्रीती अग्रवाल, इंटेरिअल इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन नरेश चौधरी, जळगाव पीपल्स बॅंकेच्या व्यवस्थापिका स्वाती सारडा, जय श्री दादाजी फाउंडेशनच्या अध्यक्षा रूपाली भावसार, प्रा. राजेश वाघुळदे यांची प्रमुख उपस्थिती होती. विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या १६ महिलांना स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी ‘आजही स्त्रीला व्यक्‍ती म्हणून अधिकार आहेत का?’ या विषयावर वक्‍तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात ॲड. दीप्ती पाटील (भुसावळ) प्रथम, अर्चना जगताप द्वितीय, तर हेमांगी पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. स्फूर्ती संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा पल्लवी भोगे- पाटील यांनी प्रास्ताविक केले. विद्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय नरेंद्र मोदी संघाचे प्रदेशा युवा अध्यक्ष अनिल पगारिया, शैलेश पांडे, वंदना माळी, मंजूषा भोगे, देविदास भावसार यांचे सहकार्य लाभले. 

यांचा झाला सत्कार
सामाजिक क्षेत्र - रजनी सावकारे (भुसावळ), लेखन क्षेत्र - स्मिता मोहरीर (नांदेड), संगीत क्षेत्र - वनिता भोकर- केतकर (अमरावती), औद्योगिक क्षेत्र - करिष्मा पाटील (जळगाव), हेल्थ केअर क्षेत्र - डॉ. सारिका शहा (यवतमाळ), सांस्कृतिक क्षेत्र - रूपाली घुले (अमरावती), रत्ना दहिवेलकर (पुणे), सामाजिक क्षेत्र - पूर्वा साळवी (विरार, मुंबई), साहित्य क्षेत्र - लीला गाजरे (ठाणे), शैक्षणिक क्षेत्र - विणा चौधरी (कल्याण), शैक्षणिक क्षेत्र - प्रा. भारती भंगाळे (नाशिक), पाककला क्षेत्र - शैला चौधरी (जळगाव), राजकीय क्षेत्र - रूपाली वाघ (जळगाव), नेहा साळी (भुसावळ), कल्पना अहिरे (धरणगाव), शैक्षणिक क्षेत्र - प्रा. मेघा बोरोले (भुसावळ).

Web Title: marathi news jalgaon news women