चाळीसगाव: विहीरीत पडून तरुणाचा मृत्यू

दीपक कच्छवा
बुधवार, 7 मार्च 2018

चिचंगव्हाण (ता.चाळीसगाव) येथील कैलास सोनवणे यांचा मुलगा विकास सोनवणे ( वय 21) हा तरूण बकऱ्या चारण्यासाठी शेत शिवारात  गेलेला होता.दुपारी तीनच्या सुमारास विकासला पाण्याची तहान लागल्याने तो पाणि पिण्यासाठी पंडीत लाला पाटील यांच्या  गट नंबर 382 मध्ये असलेल्या विहिरीवर गेला.

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) : विहीरीवर पिण्यासाठी पाणी काढतांना पाय घसरून पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच चिचंगव्हाण (ता.चाळीसगाव) येथे घडली.

चिचंगव्हाण (ता.चाळीसगाव) येथील कैलास सोनवणे यांचा मुलगा विकास सोनवणे ( वय 21) हा तरूण बकऱ्या चारण्यासाठी शेत शिवारात गेलेला होता. दुपारी तीनच्या सुमारास विकासला पाण्याची तहान लागल्याने तो पाणि पिण्यासाठी पंडीत लाला पाटील यांच्या  गट नंबर 382 मध्ये असलेल्या विहिरीवर गेला.

विहीरीवर पाणि काढत असतांना विकासचा  तोल गेल्याने तो चाळीस फुट खोल असलेल्या विहीरीत पडला. त्या विहिरीला सुमारे तीस फुट पाणी असल्याने विकासचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.या प्रकरणी मेहुणबारे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Marathi news Jalgaon news youth drown in well

टॅग्स