ग्रंथालये निघाली डिजिटलायझेशनकडे..! 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 मे 2018

ग्रंथालये निघाली डिजिटलायझेशनकडे..! 

जळगावः बदलत्या जीवनशैलीत अत्यंत जुनी ग्रंथालयेही कात टाकून डिजिटलायझेशनकडे निघाली आहेत. त्यांनीही संगणकीकृत प्रणालीचा अवलंब करीत वाचकवर्ग कायम ठेवण्यात यश मिळविले आहे. केवळ संगणकीकृत न राहता आता या ग्रंथालयांची वाटचाल ई-ग्रंथालयाकडे सुरू झाली आहे. याच धर्तीवर शहरातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्राचे डिजिटलायझेशन करण्यात आले असून, त्याचा खास ई-रीडर तयार करण्यात आला आहे. 

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील ज्ञानस्त्रोत केंद्रात विद्यार्थ्यांसाठी डिजिटल नॉलेज सेंटर तयार करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यास करता येतो. या ठिकाणी 75 विद्यार्थ्यांची व्यवस्था असणारा वातानुकूलित हॉल तयार करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्रमांकाची नोंद केल्यानंतर हॉलमध्ये आल्यानंतर कॉम्प्युटर शेजारी असलेल्या मशिनवर आपले आयकार्ड स्कॅन होते, त्यानंतर एक तास विद्यार्थी त्या ठिकाणी ई-स्टडी करू शकतो. तासाभरानंतर कॉम्प्युटर ऑटोमॅटिक शट डाऊन होते. त्यामुळे दररोज पाचशे विद्यार्थी येथे ई-स्टडी करतात. 

ई-बुक्‍सला पसंती 
काळानुरूप वाचनसंस्कृतीत बदल घडत आहे. सर्वत्र ऑनलाइन खरेदी सुरू असून, यात ई-बुक्‍सलाही वाचकांची पसंती मिळत आहे. यामध्ये तरुणांची संख्या लक्षणीय आहे. पुस्तक खरेदी करून ती वाचण्याच्या संस्कृतीबरोबरच आता इंटरनेटच्या साहाय्याने "ई-वाचना'ची संस्कृती रुजत आहे. जिल्ह्यातील अनेक शाळा डिजिटल झाल्या आहेत; तर महाविद्यालयांमध्येही ई-ग्रंथालय तयार करण्यात आले आहेत. खासगी ग्रंथालयांचे देखील रुपडे पालटून त्यांचे डिजिटलायझेशन झाले आहे. 

लाखो पुस्तकांची नोंद 
ग्रंथालयांचे डिजिटलायझेशन झाल्यामुळे एका सॉफ्टवेअरमध्ये लाखो पुस्तकांची ऑनलाइन नोंद करण्यात आली आहे. यात पुस्तकांशिवाय जर्नल, शोधप्रबंध, रिसर्च पेपर तसेच विविध गुणवत्तापूर्ण प्रकल्पांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. 
----- 

विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक यांना पुस्तकांची अधिकाधिक माहिती व्हावी व एकाच वेळी एक पुस्तक अनेक विद्यार्थ्यांना वाचता यावेत, यासाठी ई-बुक्‍स सुरू करण्यात आले आहेत. हे ई-बुक्‍स वाचण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त असे डिजिटल नॉलेज सेंटर सुरू करण्यात आले असून, याचा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर लाभ होत आहे. 
- अनिल चिकाटे, 
प्र. संचालक, ज्ञानस्त्रोत केंद्र 

Web Title: marathi news jalgaon nighali