निजामुद्दीन कनेक्‍शन; फैजपूरातून एक जण ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 एप्रिल 2020

13 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच उर्वरीत 3 संशयीत रुग्णाची तपासणी करण्यासाठी त्याला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तीघ संशयीत रुग्णांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. 

 जळगाव : दिल्ली येथे झालेल्या तबलिगी मरकज समाच्या संमेलनातून परतलेले रत्नागिरी येथील दोन जणांना शुक्रवारी रामानंद पोलिसांनी अटक केली होती. दरम्यान आज फैजपूर येथील एक जण मरकज या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे समोर आले आहे. या संशयीत रुग्णांची तपासणीसाठी त्याला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

दिल्ली येथील "तबलीग जमात'च्या संमेलनासाठी जिल्ह्यातून 13 जण सहभागी झाले असल्याची माहिती दिल्लीतून प्राप्त झाल्यावर जिल्ह्याची यंत्रणा या लोकांच्या शोधात आहे. दरम्यान, शुक्रवारी रत्नागिरी येथील दोन जण दिल्लीत मरकज या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी आपली ओळख लपवीत ते पिंप्राळा परिसरातील मशिदीजवळील खोलीत राहत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. तर आज फैजपुर येथील एक जण देखील मरकज येथील कार्यक्रमाला गेला असल्याचे निष्पन्न झाले आहे. मरकज येथून परतलेल्यांची संख्या आतापर्यंत 16 इतकी झाली आहे. या पैकी 13 जणांची तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच उर्वरीत 3 संशयीत रुग्णाची तपासणी करण्यासाठी त्याला शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तीघ संशयीत रुग्णांचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आला असून त्याचा अहवाल प्रलंबित आहे. 

मरकज येथून परतलेल्या तीघांची अहवाल प्रलंबित 
दिल्ली येथील कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील 13 जणांची यादी प्रशासनाला प्राप्त झाली होती. यामधील सर्व जणांनी आपली तपासणी केली असून या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. दरम्यान शुक्रवारी पिंप्राळा परिसरातून ताब्यात घेण्यात आलेले दोघ व फैजपूर येथून ताब्यात घेण्यात आलेला एक असे एकूण तीन संशयीत रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहे. 

दिल्लीतून परतेल्यांची संख्या 8 वर 
दिल्ली येथून परतलेल्यांना शहरातील एका रुग्णालयात क्‍वारंनटाईन केले आहे. यामध्ये भुसावळ येथील 2, रत्नागिरी येथील 2, जळगाव येथील 2, फैजपुर येथील 1, चोपडा येथील 1 असे एकूण 8 आठ जण दिल्ली येथून परतले आहे. तर वरणगाव येथील दोन जण हे शहरात आढळून आलेल्या पहिल्या कोरोनाचे नातेवाईक असून त्यांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Nizamuddin connection; One was captured from Faizpur