विनापरवानगी पक्षाचे झेंडे लावले; आठ वाहनांविरुद्ध गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

जळगाव ः भाजपतर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर पार्कवर सभा आयोजित केली होती. त्यासाठी आलेल्या वाहनांवर विनापरवानगी पक्षाचे झेंडे लावलेले होते. यावेळी निवडणूक आयोगाच्या पथकाने त्या ठिकाणी पाहणी करून विचारणा केली असता विनापरवानगी झेंडे लावल्याप्रकरणी आठ वाहनांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला. यातील तीन वाहने चालकांनी पळवून नेली आहेत. 

सागर पार्कवर भाजपतर्फे मुख्यमंत्र्यांची सभा आज दुपारी घेण्यात आली. त्यास जिल्हाभरातून लोक खासगी वाहनांतून दाखल झाले होते. सभेस आलेल्या वाहनांची निवडणूक विभागातील भरारी पथकातील अधिकारी सचिन दशथराव आयतलवाड यांच्यासह सुरेश पाटील, राजेश भावसार, राजेश विलासराव, गणेश देसले, प्रशांत पाठक या कर्मचाऱ्यांकडून सभास्थळी लावलेल्या वाहनांची तपासणी केली जात होती. याचवेळी सभास्थळी लावलेल्या आठ ते दहा वाहनांवर पक्षाचे झेंडे व मफलर लावलेले असल्याचे भरारी पथकाला दिसले. यावेळी पथकाने त्या वाहनांची व्हीडीओ काढून घेत वाहनचालकांकडे पक्षाचा प्रचार करण्याची परवानगी असल्याची विचारणा केली. त्यांच्याकडे परवानगी नसल्याने त्याठिकाणी असलेली चार वाहने रामानंद नगर पोलिस स्टेशनला दाखल केली असून आठ वाहनांसह चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या वाहनांवर झाली कारवाई 
विनापरवानगी प्रचार करणारे मिनीडोअर रिक्षा (एमएच 19 जे 6749), टाटा 407 (एमएच 18 ऐऐ 1978), टाटा 407 (एमएच 19, एस 4166), स्कॉर्पीओ (एमएच 5 बीडी 1865), स्कॉर्पीओ (एमएच 14 डीएक्‍स 2069), हिरो कंपनीची मोटारसायकल (एमएच 19 ऐडब्ल्यू 0979), स्कॉर्पीओ (एमएच 6 बीई 2637), स्कॉर्पीओ (एमएच 18 डब्ल्यू 7786). 

तीन वाहने चालकांनी पळविली 
पंचनामा करुन वाहने रामानंदनगर पोलिस स्टेशनला जमा करण्यासाठी घेवून जात असतांना चालकांनी हिरो कंपनीची मोटारसायकल (एमएच 19-एडब्ल्यू 0979), स्कॉर्पिओ (एमएच 6- बीई 2637), स्कॉर्पिओ (एमएच 18- डब्ल्यू 7786) ही वाहने पळवून नेली असून, त्यांच्याविरुद्धही आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: marathi news jalgaon no parmition veical flag