भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात चार महिलांना उमेदवारी 

भाजपकडून उत्तर महाराष्ट्रात चार महिलांना उमेदवारी 

भडगाव : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र विधानसभा, लोकसभेत महिलांना अद्याप आरक्षण मिळालेले नाही. पण भाजपने उत्तर महाराष्ट्रात वाट्याला आलेल्या सहा जागांपैकी चार महिलांना उमेदवारी देऊन महिला मतदारांना भाजपकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकीट मिळविण्याच्या या स्पर्धेत पुरूष उमेदवारांना मागे 'हम भी किसीसे कम नही' हे सिद्ध केले आहे. 

पुरूष मतदारांच्या बरोबरीने महिला मतदारांची संख्या आहे. पण त्यातुलनेने महिलांना उमेदवारी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यानुसार लोकसभा,विधानसभेत ही महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळण्याची मागणी आहे. भाजपने उत्तर महाराष्ट्रात सहा पैकी चार जागांवर महिला उमेदवारांना संधी दिली आहे. गेल्यावेळच्या तुलनेने दोन महिला उमेदवारांची संख्या वाढली आहे. 

जळगावात दोघं महिला उमेदवार 
भाजपने रात्री उशिरा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात उत्तर महाराष्ट्रातील जळगाव व दिंडोरी मतदारसंघात महिला उमेदवारांना संधी दिली आहे. त्यात जळगाव मधून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तर दिंडोरीतुन राष्ट्रवादी कॉग्रेंसच्या भारती पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय रावेर मधून विद्यमान खासदार रक्षा खडसे, नंदुरबारच्या खासदार डॉ.हीना गावित यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे भाजपची उत्तर महाराष्ट्रात महिला उमेदवारांची संख्या 4 झाली आहे. 

महिला मतदारांचा फायदा 
भाजपने उत्तर महाराष्ट्रात सहा पैकी चार जागांवर महिलांना उमेदवारी दिल्याने महिला मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. महिला उमेदवार असल्याने महिलांनाही आपलेसे वाटते. जळगाव जिल्ह्यात तर दोन्ही जागांवर महिलांना संधी देवून भाजपने नवा पायंडा पाडला आहे. महिला उमेदवारांना संधी हा प्रचाराचा चांगला मुद्दा होऊ शकतो. अर्थात प्रत्यक्षात मतदानावर त्याचा किती फायदा होईल हे मतपेटीच सांगणार आहे. मात्र तिकीट मिळविण्याच्या या स्पर्धेत महिलांनी मारलेली बाजी ही निश्‍चितच लढाई जिंकण्यापेक्षा कमी नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com