esakal | सामूहिक कॉपीच्या वादावरून विद्यापीठात गदारोळ 

बोलून बातमी शोधा

vidyapit vad imege

सामूहिक कॉपीच्या या प्रकरणात व्हॉटस्‌ऍप ग्रुपवरील मेसेज, प्रश्‍नपत्रिका, उत्तरांचे स्क्रीनशॉट आदी पुरावे कुलगुरूंना दाखवून प्राचार्य एल. पी. देशमुख यांच्यावर कारवाईचा आग्रह पियुष पाटील व विद्यार्थ्यांनी धरला.

सामूहिक कॉपीच्या वादावरून विद्यापीठात गदारोळ 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : नूतन मराठा महाविद्यालयात सामूहिक कॉपीच्या प्रकाराबाबत पियुष पाटील व कार्यकर्त्यांनी कुलगुरूंकडे तक्रार केल्यानंतर त्याबाबत मंगळवारी विद्यापीठात संबंधित प्राचार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी गेले असता कार्यकर्ते व सिनेट सदस्यांत चांगलीच खडाजंगी झाली. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार कुलगुरुंसमोर सुरू होता. त्यामुळे तणाव निर्माण होऊन पोलिसांना पाचारण करण्यात आले व नंतर वाद निवळला. 

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीची मंगळवारी  बैठक होती. या बैठकीनंतर नूतन मराठा महाविद्यालयात एक प्रश्‍नपत्रिका व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर आधीच "लीक' झाल्याचे प्रकरण घेऊन पियुष पाटील व काही विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते कुलगुरू डॉ. पी. पी. पाटील यांना भेटण्यासाठी गेले. सामूहिक कॉपीच्या या प्रकरणात व्हॉटस्‌ऍप ग्रुपवरील मेसेज, प्रश्‍नपत्रिका, उत्तरांचे स्क्रीनशॉट आदी पुरावे कुलगुरूंना दाखवून प्राचार्य एल. पी. देशमुख यांच्यावर कारवाईचा आग्रह पियुष पाटील व विद्यार्थ्यांनी धरला. त्यासाठी विद्यापीठात त्यांनी ठिय्याही दिला. 

आर्वजून पहा : पैसे दे वरना... बेटी को उठाके धंदे पे बेठाऊंगी !
 

त्यावर कोणतेही आश्‍वासन न देता प्र- कुलगुरू प्रा. माहुलीकर व प्रा. पवार यांना विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याचे कुलगुरूंनी सांगितले. प्रा. माहुलीकर यांनी विद्यार्थ्यांच्या या शिष्टमंडळास सायंकाळपर्यंत कारवाईबाबत सांगतो, असे आश्‍वासन दिले. मात्र, त्याचवेळी त्याठिकाणी उपस्थित सिनेट सदस्य व पियुष पाटील यांचे शिष्टमंडळ यांच्यात वाद होऊन खडाजंगी झाली. वातावरण त्यामुळे चांगलेच तणावपूर्ण बनले. नंतर पोलिसांना पाचारण करून वादावर पडदा टाकण्यात आला. प्राचार्यांकडून होत असलेल्या या गैरप्रकारप्रकरणी संघर्ष सुरूच ठेवू, असे पियुष पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

क्‍लिक कराः सरकारी कर्मचाऱ्यांना उरले 205 दिवस काम