एकतर्फी प्रेमातून वर्गमित्रांसह त्याच्या कुटुंबीयांचा त्रास 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

जळगाव : एकतर्फी प्रेमातून वर्गमित्रांसह त्याच्या कुटुंबीयांकडून लग्नाची मागणी होऊ लागल्याने वैतागलेल्या महाविद्यालयीन तरुणीने आज रामानंद पोलिस ठाणे गाठले. अन्‌ घडला प्रकार ऐकून पोलिसही अवाक्‌ झाले. 
अमळनेर तालुक्‍यातील प्रिया देशमुख (काल्पनिक नाव) ही जळगाव शहरात शिक्षणासाठी आली. कुटुंबाची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने शिक्षण सोबतच 

मू. जे. महाविद्यालयात 'कमवा आणि शिका' या उपक्रमांत प्रवेश घेतला आहे. तिच्या सोबतच खिरोदा (ता. रावेर) येथील सुदाम (काल्पनिक नाव) हा तरुण शिक्षण घेतोय. सोबत शिक्षण आणि वर्गमित्र असल्याने नेहमीची बोलचाल, सुरू होती. तरुणाने प्रेमाचा प्रस्ताव दिला मात्र प्रियाने स्पष्ट शब्दात नकार दिला. मात्र सुदाने चक्क कुटुंबीयांनाच प्रेमाची माहिती देत लग्नासाठी हट्ट धरला. मुलाचा हट्ट म्हणून आईनेही मुलीशी बोलण्याचा प्रयत्न करून समजूत काढली. नंतर मुलाच्या मावशीने मागणी घातली. आता चक्क मुलाच्या काकाने कहर केला, लाडक्‍या पुतण्याची अवस्था तुझ्यामुळेच अशी झाली आहे. आम्ही तुझा गैरसमज दूर करू असे सांगत भीतीतून प्रियाने आज रामानंदनगर पोलिस ठाणे गाठत कैफियत मांडली. 
... 
पोलिस काका म्हणतो... फसवले का? 
प्रेमाला नकार, लग्नाचा प्रश्‍नच येत नाही..वारंवार समजूत काढूनही उपयोग होत नाही. अखेर प्रियाने पोलिसांत तक्रार करण्याचे सांगितल्यावर शिरपूर पोलिस ठाण्यात कार्यरत सुदामच्या पोलिस काकाने प्रियाला फोन करून..मुलगा चांगला आहे, तुला काय प्रॉब्लेम आहे गैरसमज झाले असतील तर ते दूर करता येतील. असे म्हणत दबाव आणला. अखेर, मुलगी ऐकतच नाही म्हणून मग..तू त्याला फसविले का?. तुझ्यासाठी त्याने खाणे-पिणे सोडून दिले, तो जेवणही करीत नाही..असे म्हणताच मुलीला पुढचे संकेत मिळाले. तिने थेट रामानंदनगर पोलिस ठाणे गाठले. मुलाला आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून बोलावण्यात आले असून समोरासमोर बसवूनच या प्रकरणाचा आता साक्षमोक्ष लागणार आहे. 
 
Web Title: marathi news jalgaon one side love family