ऑनलाइन फसवणुकीचा इंटरनॅशनल फंडा...! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

जळगाव ः ऑनलाइन फसवणूक प्रकरणी अटकेतील तरुणाची सायबर तज्ञांनी आज दिवसभर चौकशी केल्यानंतर त्याचे कारनामे पाहून हे अधिकारी अक्षरशः चक्रावले आहेत. आंतरराष्ट्रीय वेबसाइट हॅक करून आभासी गुंतवणुकीच्या माध्यमातून गंडा घालण्याचा प्रताप या भामट्याने केल्याने हा नेमका प्रकार घडलाच कसा, याचा शोध लावण्यात पोलिसांसह सायबर तज्ञांनाही यश आले नसून, त्यासाठी आता पुण्याहून वेबसाइट हॅकिंगसह प्रोफेशनल तज्ञांच्या टिमला पाचारण करण्यात आले आहे. 

जळगाव ः ऑनलाइन फसवणूक प्रकरणी अटकेतील तरुणाची सायबर तज्ञांनी आज दिवसभर चौकशी केल्यानंतर त्याचे कारनामे पाहून हे अधिकारी अक्षरशः चक्रावले आहेत. आंतरराष्ट्रीय वेबसाइट हॅक करून आभासी गुंतवणुकीच्या माध्यमातून गंडा घालण्याचा प्रताप या भामट्याने केल्याने हा नेमका प्रकार घडलाच कसा, याचा शोध लावण्यात पोलिसांसह सायबर तज्ञांनाही यश आले नसून, त्यासाठी आता पुण्याहून वेबसाइट हॅकिंगसह प्रोफेशनल तज्ञांच्या टिमला पाचारण करण्यात आले आहे. 

औरंगाबाद येथील व्यक्तीची ऑनलाइन फसवणूक करून इतरत्रही कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या संशयावरून रामानंदनगर पोलिसांनी जळगावच्या दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील निशांत कोल्हे यास अटक होऊन दुसरा फरारी दिग्विजय पाटील याचा शोध सुरू आहे. अटकेतील भामट्याची पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्याला 3 दिवसांची कोठडी मिळाली 

औरंगाबादच्या त्रिवेणी नगरातील जयरुद्दीन बदरुद्दीन शेख (वय 56) यांची वेबसाइट ऑनलाइन ट्रेडमिलमध्ये जळगावचे हॅकिंगमध्ये निष्णांत असलेले दिग्विजय पाटील व निशांत कोल्हे या दोघांनी प्रवेश केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेब हॅकिंग करून त्यांनी 84 हजार 599 रुपयांत गंडवल्यावर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी आज निशांत कोल्हेच्या वापरातील संगणक व सर्व साहित्य ताब्यात घेऊन सायबर तज्ञांच्या टिमसमक्ष त्याची चौकशी सुरू केली. दिवसभर चौकशीअंती निशांतकडून केवळ जुजबी माहिती मिळाली असून, नेमका तो आंतरराष्ट्रीय वेबसाइट हॅकिंगपर्यंत पोचलाच कसा आणि त्याने कोणत्या पद्धतींचा अवलंब केला. याचा शोध घेण्यात तज्ञांनी संपूर्ण कसब पणाला लावले आहे. हॅकर निशांत कोल्हे समोर सायबर तज्ञही हतबल झाल्याची परिस्थिती असून, अधिक तपास आणि गुन्ह्यातील आवश्‍यक पुरावे संकलित करण्यासाठी व फसवणुकीचे ऑनलाइन प्रकार थांबवण्यासाठी पुण्याहून सायबर हॅकिंगमध्ये निष्णांत असलेल्या टिमला बोलावण्यात आले आहे. 

हॅकर गॅंग असल्याचा संशय 
आंतरराष्ट्रीय वित्तीय कंपन्यांच्या वेबसाइट हॅक करून त्याद्वारे ग्राहकांना बुलियन करन्सीच्या माध्यमातून (आभासी गुंतवणूक) आकर्षित करून कोट्यवधींची फसवणूक करणारी मोठी हॅकर गॅंग सक्रिय असल्याचा तज्ञांचा संशय असून, पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताकडून मात्र हवे ते तांत्रिक इनपुट्‌स तज्ञांना उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे नेमका प्रकार हे तज्ञही सांगू शकत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

वेबसाइटवर छेडखानी 
ताब्यात घेतलेल्या निशांत कोल्हे याने आंतरराष्ट्रीय वायदे बाजारातील "रेडरूम', "डार्कनेट', "ड्रीम मार्केट' वेबसाइटवर छेडखानी केली आहे. पोर्नसाइट, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज पेडलर्स यांच्या वापरातील साइटवरही हॅकिंगची भामटेगिरी करण्यात आल्याचे समोर आले असून, ते सिद्ध झाल्यास नायजेरियन हॅकर्सच्याही पुढे जळगावच्या या भामट्याची मजल गाठल्याचे पुढे येईल, असे तज्ञांचे मत आहे. दरम्यान, निशांतच्या संपर्कातील आणि वेब सर्कल मध्ये सक्रिय चार तरुणांकडून रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून माहिती घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: marathi news jalgaon online crime