ऑनलाइन खरेदी केलेली सायकल परस्पर विकली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

जळगाव ः ऑनलाइन खरेदी केलेल्या सायकलची परस्पर विक्री केल्याप्रकरणी शिव कॉलनीमधील दोन जणांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ऑनलाइन खरेदीच्या वस्तू परस्पर विक्री करणारी टोळी असल्याची शक्‍यता असून, याबाबत पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात आहे. 

औरंगाबाद येथील जयरुद्दीन बदरुद्दीन शेख यांनी फिटनेस वन इंडिया लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन 84 हजार 599 रुपये कंपनीची ट्रेडमिल सायकल खरेदी केली होती. दरम्यान, शिवकॉलनीतील रहिवासी दिग्विजय पाटील व निशांत कोल्हे यांनी ही सायकल जयरुद्दीन शेख यांना न पाठविता या सायकलची परस्पर विक्री केली. त्यामुळे याप्रकरणी जयरुद्दीन शेख यांच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, निशांत कोल्हे यास पोलिसांनी अटक केली आहे. तपास पोलिस निरीक्षक बापू रोहम करीत आहे. 

तीन दिवसांची पोलिस कस्टडी 
याप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी निशांत कोल्हे यास न्यायालयात हजर केले. न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी 
रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी चौकशी केली. ऑनलाइन खरेदी, विक्रीची मोठी टोळी असल्याची शक्‍यता पोलिसांकडून वर्तवली जात असून, त्या दृष्टीने तपास केला जात आहे. 

Web Title: marathi news jalgaon online cycle