"आउटलेट' न काढल्याने नवा बोगदा पाण्यात 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

जळगाव : महापालिका प्रशासनाने बजरंग बोगद्याला समांतर नवीन बोगदा नागरिकांच्या व वाहनधारकांसाठी सोईसाठी तयार केला. मात्र, मंगळवारी (5 जून) रात्री अर्धा तास झालेल्या पावसाने हा बोगदा पाण्याने तुडुंब भरला. रेल्वे प्रशासनाने बोगद्यात "आउटलेट' तयार न काढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्याबद्दल महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 

जळगाव : महापालिका प्रशासनाने बजरंग बोगद्याला समांतर नवीन बोगदा नागरिकांच्या व वाहनधारकांसाठी सोईसाठी तयार केला. मात्र, मंगळवारी (5 जून) रात्री अर्धा तास झालेल्या पावसाने हा बोगदा पाण्याने तुडुंब भरला. रेल्वे प्रशासनाने बोगद्यात "आउटलेट' तयार न काढल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, त्याबद्दल महापालिका पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. 
शहरातील भोईटेनगर, भिकमचंद जैननगर, एमएमआयटी महाविद्यालय, मुक्ताईनगरसह पिंप्राळ्याकडे जाण्यासाठी नागरिक बजरंग बोगद्याच्या मार्गाने जातात. जुन्या बोगद्यात पावसाळ्यात पाणी तुंबणे, वाहतूक ठप्प होण्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे बजरंग बोगद्याला लागून समांतर बोगदा करण्यासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करून महापालिकेने रेल्वे प्रशासनाकडून बोगद्याचे काम पूर्ण केले. मात्र, प्रत्यक्षात रेल्वे प्रशासनाने बोगद्याचे काम करताना पाण्यासाठी आउटलेट न काढल्याने नव्या बोगद्यातही पाणी तुंबण्याची समस्या कायम आहे. 

रेल्वे प्रशासनाची जबाबदारी 
महापालिकेने निधी देऊन बोगद्याचे काम रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून केले. मात्र काम पूर्ण झाल्याचे सांगून काही दिवसापासून हा बोगदा सुरू केला. मात्र बोगद्यात पाणी तुंबल्याने रेल्वे प्रशासनाच्या कामांवर देखील संशय निर्माण झाला असून, नगरसेवक तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे प्रशासनाच्या या निष्काळजीबद्दल नाराजी व्यक्त केली. 

रेल्वे अभियंत्याची बदली 
नवीन बोगद्यांमध्ये पाणी तुंबल्याने महापालिकेचे बांधकाम अभियंता सुनील भोळे तसेच नगरसेवक संदेश भोईटे यांनी रेल्वेचे अभियंता शशिकांत पाटील यांना संपर्क केला. परंतु, त्यांची बदली भुसावळला झाली असल्याचे सांगितले. बोगद्यात चार फूट व्यासाचे आउटलेट काढण्याचे काम बाकी असून, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत करून देण्याचे आश्‍वासन दिले. 
 
नाल्यांच्या स्थलांतराचे काम बाकी 
एसएमआयटी कॉलेजकडून बजरंग बोगद्याकडे येणाऱ्या नाल्याचे 25 कोटींच्या कामातून नाल्याचे काम केले जाणार आहे. परंतु, शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हे कामदेखील रखडले आहे. 

समांतर बोगद्याच्या कामाबाबात रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा केला आहे. त्यांनी बोगद्याला आउटलेट न काढल्याने पावसाच्या पाण्याने तुंबला. रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क झाला असून आउटलेट लवकरात लवकर काढून देण्याचे आश्‍वासन दिले आहे. 
- संदेश भोईटे, नगरसेवक.

Web Title: marathi news jalgaon outlate water