संपत्तीच्या वादातून काकाने केला पुतण्याचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

पाचोरा ः संपत्तीच्या वादातून वाद होवून पिता- पुत्रांनी एकास मारहाण केल्याने त्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना पाचोरा येथील शिवाजीनगर भागात आज घडली. शिवाजीनगर परिसरातील किशोर मोरे (वय 30) याचा तरूणाचा मारहाणीत मृत्यू झाला. मृत्यू झाल्या प्रकरणी पाचोरा पोलिसात पिता- पुत्र विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पाचोरा येथे संपत्तीचा मोरे कुटूंबात वाद सुरू होता. याच संपत्तीच्या वादातून मयत किशोर मोरे यांचा व त्यांचे काका सिद्धेश्वर मोरे (वय 54) व त्यांचा मुलगा सोमनाथ मोरे (वय 31) या दोघांनी 2 एप्रिलला किशोर यास मारहाण केली होती. या वादात त्यांच्या डोक्‍यात लोखंडी रॉड मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला असल्याची तक्रार पोलिसात दिल्यावरून काका सिद्धेश्‍वर मोरे व त्यांचा मुलगा सोमनाथ मोरे (रा. शंकरनगर, अंतुर्ली रोड पाचोरा) या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला. यानंतर पिता- पुत्रांना अटक करण्यात आली आहे. सदर घटनेचा तपास पोलिस निरिक्षकांशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज शिंदे करीत आहेत. 

Web Title: marathi news jalgaon pachora murder