हतनूरला आढळला अतिदुर्मिळ "रेड फ्यालोरफ'पक्षी 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 मे 2018

हतनूरला आढळला अतिदुर्मिळ "रेड फ्यालोरफ'पक्षी 

तांदलवाडी (ता. रावेर), : हतनूर धरणावर प्रथमच रेड फ्यालोरफ हा स्थलांतरित व अतिदुर्मिळ पाणपक्षी आढळला असून उत्तर महाराष्ट्रात पहिलीच तर महाराष्ट्रातील ही तिसरी नोंद ठरली आहे. वरणगावच्या पक्षीमित्रांनी यापक्षाचा शोध लावला. 

हतनूरला आढळला अतिदुर्मिळ "रेड फ्यालोरफ'पक्षी 

तांदलवाडी (ता. रावेर), : हतनूर धरणावर प्रथमच रेड फ्यालोरफ हा स्थलांतरित व अतिदुर्मिळ पाणपक्षी आढळला असून उत्तर महाराष्ट्रात पहिलीच तर महाराष्ट्रातील ही तिसरी नोंद ठरली आहे. वरणगावच्या पक्षीमित्रांनी यापक्षाचा शोध लावला. 

वरणगाव येथील चातक निसर्ग संवर्धन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन व समीर नेवे हे नेहमीप्रमाणे हतनूर जलाशयावर पक्षीनिरीक्षण करण्यासाठी आले असता त्यांना एक वेगळा पक्षी आढळून आला. त्यावर संशोधन करून हा स्थलांतरित व अतिदुर्मिळ रेड फ्यालोरफ असल्याचे सिद्ध झाले. 
हतनूर धरण हे खानदेशातील एक महत्त्वाचे पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्र आहे. सध्या धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे दलदल तयार होऊन काही पाणपक्षांसाठी उपयुक्त खाद्य उपलब्ध होत आहे. दक्षिणेकडून युरोप मध्ये जाणारे पाणपक्षी हतनूर जलाशयाकडे आकर्षित होत आहे. यावर्षी प्रथमच रेड फ्यालोरफ या अत्यंत दुर्मिळ पक्षाने हजेरी लावली असून, तो दक्षिणेतून युरोपात स्थलांतर करीत असतो. मार्गात कुठे चांगले खाद्य मिळाल्यास काही दिवस मुक्काम करतो. 
जलाशयाच्या दलदलीमुळे उन्हाळ्यात सुद्धा पक्षांसाठी विपुल प्रमाणात अन्न उपलब्ध असल्यामुळे काही विदेशी पक्षांचा मुक्काम वाढलेला आहे. या जलाशयाला पक्षी जैवविविधता अधिवास क्षेत्राचा दर्जासुद्धा प्राप्त झाला आहे. 
हा स्थलांतरित व अतिदुर्मिळ पक्षी पाहण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, धुळे, जळगाव येथून पक्षीमित्र प्रज्ञावंत माने, सचिन मैंन, डॉ. अभय पाटील, प्रकाश काळे, डॉ.व्यवहारे, डॉ.चांडक, डॉ. अनुराग चांडक, प्रशांत पाटील, राजपालसिंग राजपूत, सौरभ महाजन, पियुष महाजन आदींनी हजेरी लावली. 
.......... 
जलाक्षयावर दुर्मिळ प्रजाती 
या जलाशयावर मोठा आरली, बाकचोच्या तुतारी, टेमिंकचा टिलावा, भांडखोर पानलावा, छोटा सुरय, चमच्या, लालसरी, रेड फ्यालोरफ असे दुर्मिळ व धोकाग्रस्त पक्षी प्रजाती आढळली आहेत. 
-------------- 
कोट 
हतनूर जलाशयावर अतिदुर्मिळ रेड फ्यालोरफ आढळल्याची उत्तर महाराष्ट्रात पहिलीच तर महाराष्ट्रातील तिसरी नोंद ठरली याचा आनंद आहे. हतनूर धरणावर सैबेरिया, युरोप, लडाख, मंगोलिया आदी देशांतून स्थलांतरित पक्षी येतात. जळगाव वन विभागाच्या अनास्थेमुळे महत्त्वाच्या पक्षी अधिवासाकडे दुर्लक्ष होते. शासनाने हतनूर जलाशयाला रामसर चा दर्जा द्यावा. 
-अनिल महाजन. 
पक्षी अभ्यासक, वरणगाव. 
------------------- 
 

Web Title: marathi news jalgaon pakshi