सकारात्मक संवादातूनच पाल्याची जडणघडण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 जून 2018

जळगाव ः पाल्याचे संगोपन करताना पालकांना अलीकडच्या स्पर्धेच्या युगात अधिक जागरूकता ठेवावी लागत आहे. पाल्याची एकूणच वर्तणूक कुटुंबातील वरिष्ठांच्या, पर्यायाने पालकांच्या वागण्यातून घडत असते. त्यामुळे घराला घरपण देणारी माणसे घरात एकमेकांशी कशी वागतात, यावर पाल्याचे भविष्य, त्याची जडणघडण अवलंबून असते. दुर्दैवाने कुटुंबातील पालकांमधील परस्पर संवादच लुप्त होत असल्याने पाल्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. पालकांनी त्यांच्या वागण्यात सकारात्मक बदल केल्यास त्यांच्या पाल्यातील जगण्यात परिवर्तन होऊ शकेल. 

पूर्वीप्रमाणे घरात संवाद होत नाही. एकमेकांशी बोलले तरी बोलणे म्हणजे टिफिन दे, आज उशीर होईल, उद्या लवकर उठव, मला पैसे पाहिजे, घरी यायला उशीर होईल या अशा बोलण्याला संवाद म्हणता येणार नाही. ही सर्व फक्त आपल्या कामाची आठवण करून देणारी वाक्‍य आहे. पालकच असे वर्तन करत असल्यामुळे मुलं देखील त्यांच अनुकरण करतात. यात बालक संवाद म्हणजे काय हे कसे व कुठे शिकणार. 

जसे पेराल तसे उगवेल 
पालक बालक संवाद असो किंवा पालकांचा एकमेकांशी असणारा संवाद. कुटुंबातील लहान लहान प्रश्न देखील संवाद नसल्याने गंभीर बनतात. आजकाल बालक अगदी क्षुल्लक अपयश पचवणे ही सहन करू शकत नाही. बालक- पालक संवाद गरजेचा आहे. याची सुरवात पालकांच्या एकमेकांशी असलेल्या संवादापासून होते. जसं पेराल तसं उगवेल, अशी म्हण यासाठी उचित म्हणता येईल. 

दुराव्याची कारणे 
- मुलांना वेळ न देणे 
- मुलांच्या आयुष्यात जास्त लक्ष देणे 
- प्रमाणापेक्षा अधिक हट्ट पुरविणे 
- एकमेकांकडून असणाऱ्या अपेक्षा 
- सोशल मीडियाचा अधिक वापर 
 
दुराव्याचे परिणाम 
- विचारांमध्ये अंतर निर्माण होणे 
- पालकांना गृहित धरणे 
- असंवेदनशील बनणे 
- वृद्धाश्रमासारखे पर्याय निवडणे 
- आत्महत्येसारखा मार्ग अवलंबणे 
 
हे असू शकता उपाय 
- कौटुंबिक संवाद हवा 
- मुलांना मोकळीक द्यावी 
- मुलांची क्षमता समजून घ्यावी 
- शिस्त व लाड यांत समन्वय हवा 
- सोशल मीडियाचा कमी वापर 

ज्याप्रमाणे आपण जगात शाश्‍वत व्यवसाय बघतो त्याचप्रमाणे शाश्‍वत पालकत्वही महत्त्वाचे आहे. पालकांच्या संस्कारांतूनच पुढची पिढी घडत असते. त्यामुळे आजकाल पालकांना शाश्‍वत पालकत्वाची जाणीव होणे सर्वांत गरजेचे आहे. 
- मनोज गोविंदवार (समुपदेशक) 

Web Title: marathi news jalgaon palak sanwad