यंदा डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा! 

यंदा डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा! 

जळगाव ः जिल्ह्यातील वाघूर, हतनूर, गिरणा धरणात सध्या पाणीसाठा असला, तरी मध्यम प्रकल्पांत ठणठणाट आहे. यामुळे यंदा डिसेंबरपासूनच पाणीटंचाईची तीव्रता होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. अत्यल्प पाऊस व पावसाच्या ओढीमुळे जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांत दुष्काळजन्य स्थिती आहे. दुष्काळाबाबत अंतिम अहवाल पाठविण्यासाठी उद्या (22 ऑक्‍टोबर) जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक दुपारी बाराला जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आली आहे. 
जिल्ह्यातील 13 तालुक्‍यांत 75 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खरिपाची पिके केवळ नावाला उभी आहेत. जनावरांसाठी लागणारा चारा अल्प प्रमाणात आहे. रोजगार हमी योजनेंतर्गतही कामे नसल्याचे चित्र आहे. गंभीर स्वरूपाचा दुष्काळ असल्याचा पीक सर्वेक्षण महसूल, कृषी विभागाने केले आहे. त्याबाबतचा अंतिम अहवाल उद्या (ता.22) तयार होईल. त्यासाठीच दुष्काळ समितीची बैठक होत आहे. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात येऊन गेल्यानंतर जिल्हा प्रशासनाने प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांचे सर्व्हेक्षण करण्यावर भर दिला. त्यात जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, भडगाव, बोदवड, पारोळा या 13 तालुक्‍यांमध्ये पीक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात पिकांची स्थिती अतिशय नाजूक असून उत्पादन येण्याची स्थिती नाही. रब्बीचा हंगामही संकटात आहे. याबाबतचे चित्र स्पष्ट झाले. 
पिकांच्या स्थितीसोबतच पाणीपुरवठा, जनावरांसाठी लागणारा चारा, रोजगार हमी योजनेअंतर्गत उपलब्ध होणारा रोजगार याचाही अहवाल विभागीय आयुक्‍तांनी मागविला होता. त्यानुसार वरील तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाईची चिन्हे आहे, चाऱ्याचा साठा अत्यल्प आहे. फेब्रुवारी अखेर चाराटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता आहे. रोजगार हमी योजनेबाबतही फेब्रुवारीपर्यंत रोजगार उपलब्ध होणार नाही, अशी स्थिती आहे. 

जिल्ह्यातील पाणीसाठा असा 
धरण--पाणीसाठा द.ल.घ.मी.--टक्केवारी 
हतनूर--214--100 
गिरणा--391.68--47.07 
वाघूर--229.45--44.19 
अभोरा-317,58--99.90 
मंगरूळ--331.50--100.0 
सुकी--371.8--98.68 
मोर--320.2--54.51 
अग्नावती-296.66--53.76 
हिवरा--283.01--31.50 
बहूळा--243.92--0.00 
तोंडापूर--38.52--3.25 
अंजनी--221.4--0.00 
गूळ--267.45--86.38 
भोकरबारी--227.50--0.00 
बोरी--262.0.00 
मन्याड--362.0--0.00 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com