चिमणराव पाटील हे गर्दीत साप सोडणारे नेते : आमदार डॉ. सतीश पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पारोळा : गेल्या चार वर्षात चिमणराव पाटील यांनी शेतकऱ्यासाठी एक आंदोलन, एक रास्तारोको, एक उपोषण, एक निवेदनहह दिलेले नाही. बाराशे रुपयांचा फवारणी पंप 1800 रुपयांत विकून 600 रुपयांचा नफा कमविणारे चिमणराव पाटील हे संभ्रम निर्माण करून गर्दीत साप सोडणारे नेते आहेत, असा प्रतीआरोप आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला. 

पारोळा : गेल्या चार वर्षात चिमणराव पाटील यांनी शेतकऱ्यासाठी एक आंदोलन, एक रास्तारोको, एक उपोषण, एक निवेदनहह दिलेले नाही. बाराशे रुपयांचा फवारणी पंप 1800 रुपयांत विकून 600 रुपयांचा नफा कमविणारे चिमणराव पाटील हे संभ्रम निर्माण करून गर्दीत साप सोडणारे नेते आहेत, असा प्रतीआरोप आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला. 
माजी आमदार चिमणराव पाटील यांनी एका कार्यक्रमातून आमदार डॉ. पाटील आणि खासदार ए. टी. पाटील यांच्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याची टीका केली होती. त्यास आमदार डॉ. पाटील यांनी तहसील कार्यालयात आज सांयकाळी पाचला पत्रकार परिषद घेऊन प्रतिउत्तर दिले. यावेळी तहसीलदार वंदना खरमाळे, एरंडोलच्या तहसीलदार सुनीता जऱ्हाडे, तालुका कृषी अधिकारी आर. एच. पाटील, शीतल तंवर, नायब तहसीलदार एन. झेड. वंजारी आदी उपस्थित होते. 
आमदार डॉ. पाटील म्हणाले, की बोंडअळीचे मतदारसंघात 58 कोटी रुपये अनुदान मागणीपैकी 31 कोटी 89 लाख 73 हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहेत. उर्वरित रक्कमही निधी प्राप्त होताच शेतकऱ्यांना वितरित होईल. यातून एकही शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी आपण लक्षवेधी मांडली होती. जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदनही दिले आहे. मी जागृत लोकप्रतिनिधी आहे. प्रभावहीन व उदासीन नाही. कपाशीच्या पंचनाम्यात गोंधळ होईल म्हणून पीक पेऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांना बोंडअळीची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी अधिवेशनात केली होती. तत्कालीन कृषिमंत्री (कै.) पांडुरंग फुंडकर यांनी ती मान्य केली होती. त्यानुसार शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळत आहे. एकूण क्षेत्रापैकी कुठलाही क्षेत्र कपात न होता पूर्ण अनुदान हे जमा होत आहे. जिल्ह्यात कुठेच भेदभाव नाही. मात्र, विरोधक चिमणराव पाटील हे जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करीत आहे. मी सातत्याने या संदर्भात पाठपुरावा करून प्रश्‍न, समस्या सोडवीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा प्रश्‍न नाही. उलटपक्षी माजी आमदार पाटील पंप वितरणाचा धंदा मांडून शेतकऱ्यांना लुटत आहेत. 
पत्रकार परिषदेला रोहन पाटील, यशवंत पाटील, किशोर पाटील, डी. के. पाटील, दिगंबर पाटील, पांडुरंग पाटील, हिंमत पाटील आदी उपस्थित होते. 

गेल्या पंचवीस वर्षांपासून निलकमल पार्टिकल बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे शेअर जमा करून अद्याप कुठलाच हिशोब त्यांनी दिलेला नाही. पैसे परत केलेले नाही. निवडणुका समोर आल्या की, ते वाऱ्याच्या दिशेने आरोप करतात. जनता मात्र वाऱ्यावर नाही तर कृतीवर मतदान करते. म्हणूनच जिल्ह्यात मी एकमेव विरोधी आमदार म्हणून निवडून आलो आहे. आरोप करण्यापेक्षा त्यांनी पुन्हा निवडणुकीला सामारे जावे असे आव्हान आमदार डॉ. पाटील यांनी देवून अधिकाऱ्यांकडून पूर्ण आकडेवारी घेत चिमणराव पाटलांचे आरोप खोडून काढले आहेत. 

1300 रुपयात पंप देणार 
विरोधक 1800 रुपयात पंप देत आहे. तोच पंप मी 1300 रुपयात शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत आहे. तसेच बोंडअळीसाठीचे फोरेमन सापळे हे चाळीस रुपयात उपलब्ध करून देत आहे. शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून कृषी साहित्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही आमदार डॉ. पाटील यांनी यावेळी केले.

Web Title: marathi news jalgaon parola mla satish patil chinrao patil