"पेनकिलर'चा अतिरेकी वापर ठरू शकतो "घातक' 

pain keiller
pain keiller

जळगाव : बदलत्या जीवनशैलीनं शरीराला मशिन बनवून टाकलंय.. त्यातून डोकेदुखी, पोटदुखी अथवा कधीकधी शरीरामध्ये पेटके येणं ही साधारण बाब झाली आहे. त्यातून तातडीने दिलासा मिळावा म्हणून आपण एक पेनकिलर (Pain Killer) घेऊन टाकतो. मात्र, बऱ्याचदा या वेदनाशामक गोळ्या शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या ठरतात. 

लहान सहान आजारात काहीजण स्वतःवरच औषधोपचार करून घेतात, पाठदुखी डोकेदुखी सर्दी खोकला तोंड येणं ते अंगदुखी ते ऍसिडिटी या साऱ्यांवर सर्रास स्वतःच्या मनाला वाट्टेल ती औषधी घेतात अथवा डॉक्‍टरांकडे जायचा कंटाळा म्हणून त्यांनी लिहून दिलेली जुनीच औषध पुन्हा घेतात. कोणत्याही दुखण्यापासून "रिलिफ' मिळावा म्हणून अशाप्रकारच्या वेदनाशामक गोळ्या घेण्याचे प्रकार वाढत आहेत. या गोळ्या थेट किडनीवरही परिणाम करू शकतात. शिवाय, त्यातून ऍसिडिटीही वाढते. 20 ते 30 वयोगटातील व्यक्तींमध्ये हे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. 

"पेनकिलर'ला पर्याय काय ? 
होमिओपॅथीमध्ये पेन किलर ला पर्याय सुचविलेला आहे. नव्या संशोधनातून रुग्णाला लवकर आराम मिळतो मात्र ऍलोपॅथीप्रमाणे एकच औषध न देता रुग्णाचा आजार, दुखण्याचे प्रमाण आदी स्थितीवर ती औषधं दिली जातात यामुळे रुग्णाच्या लिव्हर आणि किडनीचे नुकसान होत नाही. 

वेदनाशामक गोळ्या घेताना ही घ्या काळजी 
- उपाशी पोटी कोणतीही गोळी घेऊ नका 
- एकापेक्षा अधिक पेनकिलर घेण्याचा मोह टाळा 
- वेदनाशामक गोळ्यांची सवय लावू नका 
- दुखणे जास्त असले तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्या 
- गोळ्यांच्या दुष्परिणामाविषयी डॉक्‍टरांकडून माहिती घ्या 

पेनकिलरच्या अतिवापरामुळे अनेकदा रुग्णांच्या लिव्हर आणि किडनीचे मोठे नुकसान होऊ शकते. होमिओपॅथीमध्ये रुग्णाचा आजार आणि आजाराची सद्यःस्थिती बघून निदान करता येऊ शकते. 
- डॉ. अंतिम सोमाणी, होमिओपॅथी तज्ज्ञ, जळगाव 

काही प्रकारच्या वेदनाशामक या सहज उपलब्ध होतात, परिणामी त्यांची सवय जडते आणि एकप्रकारे व्यसन लागते. काही वेदना या अल्प काळासाठी होत असतात परंतु वेदना कमी होण्याची वाट न पाहता लगेच पेनकिलर घेणे ही टाळले पाहिजे. 
- डॉ. प्रदीप जोशी, अध्यक्ष, आयएमए 
 
मला मायग्रेन, खोकल्याचा त्रास गेल्या अनेक दिवसांपासून होता. साधारण पंधरा दिवसांपासून मी होमिओपॅथीचा उपचार केल्यानंतर बरेच प्रमाणात आराम मिळाला. 
- मितल जाधव, शिक्षिका, सेंट टेरेसा इंग्लिश स्कूल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com