भडका...इंधन दरवाढीचा अन्‌ ग्राहकांच्या संतापाचा! 

residentional photo
residentional photo

जळगाव : पेट्रोल- डिझेलची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर अवलंबून असली तरी सरकारने प्रयत्न केले तर दरवाढ आटोक्‍यात येऊ शकते. गेल्या काही महिन्यांत इंधनाचे दर दहा-पंधरा रुपयांनी वाढल्याने वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. शहरात सोमवारी (22 मे) पेट्रोलचे दर प्रतिलिटर 85.54 रुपये तर डिझेल 72.31 इतके होते. मोदींनी महागाई नियंत्रणाचे दिलेले आश्‍वासन फोल ठरले असून ग्राहकांची मोठी लूट चालली आहे. अशा तीव्र शब्दांत वाहनधारकांनी इंधन दरवाढीच्या भडक्‍याविरोधात आपल्या संतप्त भावनांना वाट करून दिली. 
 
वाहनधारकांचे बोल..
 
पेट्रोल- डिझेलची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या दरावर अवलंबून असते. भारताला या तेलासाठी अन्य राष्ट्रांवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे इंधनाची दरवाढ ही आपली नव्हे तर आंतरराष्ट्रीय समस्या आहे. भारत इंधनाबाबत परावलंबी असल्याने आपल्याला त्याची झळ सोसावी लागत आहे. 
- डॉ. गो. दा. फेगडे 
 
इंधन दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारावर अवलंबून असली तरी दर दिवसाला होणारी भाववाढ योग्य नाही. मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी महागाई नियंत्रणाचे आश्‍वासन दिले होते. मात्र, हे आश्‍वासन सरकारने पाळले नाही. इंधन दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने हा घटक जीएसटीच्या कक्षेत आणला पाहिजे. 
- मनोहर बढे 
 
इंधनाचे वाढीव दर सर्वसामान्यांसाठी जाचक आहेत. गेल्या काही महिन्यांत हे भाव गगनाला भिडले असून वाहन वापरणे कठीण झाले आहे. सरकारने त्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे. त्यासाठी इंधनावरील एक्‍साईज ड्यूटी कमी करून लोकांना दिलासा देणे गरजेचे आहे. 
- व्ही. एल. कावळे 

मोदी सरकारने अनेक आश्‍वासने दिले, त्यात महागाई नियंत्रणाचेही म्हटले होते. मात्र, इंधन दरवाढीसह सर्वच बाबतीत महागाई वाढली आहे. पेट्रोल दरवाढीमुळे आता मोटारसायकली चालवणे बंद करून सायकल चालवावी लागेल, अशी स्थिती आहे. 
- अनिल भोई 
 
इंधनाची दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असल्याने ती अपरिहार्य आहे. सध्याची पेट्रोल दरवाढ ही मागील सरकारच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे. तरीही या सरकारकडून जनतेला मोठ्या अपेक्षा असल्याने दरवाढीबाबत योग्य ते धोरण ठरवले पाहिजे. 
- परेश नेवे 

असे सुचविले उपाय 
- जीएसटीच्या कक्षेत आणावे 
- दरांबाबत योग्य धोरण ठरवावे 
- एक्‍साइज ड्यूटी कमी करावी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com