इंधन दरवाढीच्या निषेधार्थ उद्या जळगाव जिल्हा बंद 

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ उद्या जळगाव जिल्हा बंद 

जळगाव: पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफीही केली जात नाही. त्यामुळे सर्वच पातळीवर देशातील व राज्यातील शासन फेल झाले आहे. त्याच्या निषेधार्थ कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्षातर्फे सोमवारी (ता. 10) भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच अंतर्गत जळगाव जिल्ह्यातही बंद पाळण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 

कॉंग्रेस भवनात आज कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, कार्याध्यक्ष विलास पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष ऍड. ललिता पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे, महानगर कार्याध्यक्ष डॉ. राध्येश्‍याम चौधरी, डि. जी. पाटील आदी उपस्थित होते. यावेळी माहिती देताना ऍड.रवींद्र पाटील म्हणाले, की देशभरात दररोज पेट्रोल, डिझेलमध्ये दरवाढ होत आहे. त्यामुळे इतर वस्तूच्या किमतीतही वाढ होत असून सर्वसामान्य माणूस त्रस्त झाला आहे. त्यांच्या निषेधार्थ बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही पाठींबा देवून बंदमध्ये सहभागी व्हावे. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड.संदीप पाटील म्हणाले, की देशात इंधनाची दररोज भाववाढ होत आहे. या सरकारचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व समविचारी पक्षातर्फे बंदचे आवाहन केले आहे. त्यात नागरिकांनीही सहभागी व्हावे. माजी खासदार उल्हास पाटील यांनीही सरकारच्या कारभारावर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com