पीक कर्जदारांचे जातीनिहाय वर्गीकरण 

मंगळवार, 22 मे 2018

जळगाव : पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे जातीनिहाय वर्गीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. पीक कर्ज देतानाही जातीची नोंदच अर्जात नमूद नाही. मात्र, नाबार्डने (राष्ट्रीय शेती व ग्रामीण विकास बॅंक) यावेळी प्रथमच पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची जातीनिहाय माहिती जिल्हा सहकारी बॅंकांकडून मागविली आहे. तथापि, ही माहितीच उपलब्ध नसल्याने ती कशी द्यावी, याबाबत अधिकारीही संभ्रमात पडले आहेत. ही माहिती दिली नाही, तर बॅंकांना पीक कर्ज व्याजाच्या अनुदानापोटी मिळणारे 50 ते 60 कोटी बुडणार आहेत. नाबार्डने तशी तंबीच दिल्याने आधीच अडचणीत असलेल्या जिल्हा सहकारी बॅंका हवालदिल झाल्या आहेत. 

राज्यातील सहकारी बॅंकांकडून शेतकऱ्यांना हंगामासाठी स्वनिधीतून अल्पमुदत पीककर्ज वितरण करण्यात येते. या कर्जवितरणाचा नाबार्डकडून दोन टक्के, तीन टक्के प्रतिशेतकरी व्याज परतावा देण्यात येतो. मात्र, सन 2014 पासून नाबार्डने बॅंकांना पीक कर्जावरील व्याज परतावा दिला नाही. आता या परताव्यासाठी बॅंकेने पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची जातीनिहाय माहिती देण्याचा आदेशच जारी केला आहे.

Web Title: marathi news jalgaon pik loan