पीकविमा योजनेतूनच आता शेतकऱ्यांना भरपाई : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर

पीकविमा योजनेतूनच आता शेतकऱ्यांना भरपाई : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ठाकूर

जळगाव ः शेतकऱ्यांनी आर्थिक संकटापासून संरक्षण करावयाचे असल्यास आपल्या पिकांचा विमा काढणे अत्यंत गरजेचे आहे. आगामी काळात शासनाकडून नुकसान भरपाईची मदत बंद होऊन केवळ पीकविमा हाच चांगला पर्याय राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा योजनांचा लाभ घेतलाच पाहिजे, असे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी "कॉफी विथ सकाळ'च्या माध्यमातून व्यक्त केले. 
जिल्ह्यात पाऊस 66 टक्के झाला आहे. मात्र तो अंतराअंतराने झाला. त्याचा पिकांच्या वाढीवर, उत्पादनावर परिणाम झाला आहे. सर्वच पिकांच्या उत्पादनात यंदा तीस ते पस्तीस टक्के घट येणार आहे. जिल्ह्यात परतीच्या पावसावर पिकांचे भवितव्य अवलंबून आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल तर त्यांना विम्याची रक्कम मिळेल. मिळालेल्या रकमेतून शेतकरी सावरेल. पुन्हा उभारी घेईल. यामुळे कोणत्याही पिकाचा, फळांचा विमा काढणे ही आजच्या काळाची गरज आहे. 
पावसाचे दिवसमान कमी झाल्याने जो पाऊस पडेल त्याचा थेंब न थेंब जमिनीत जिरविला गेला पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना शेततळे, विहीर पुनर्भरण, नालाबंडिंग अशी कामे करता येतील. जो पाऊस पडेल तो आपल्याच परिसरात जिरविला गेला तर त्या परिसरात सिंचन वाढेल. शेततळे, विहिरीत बाराही महिने पाणी राहील. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना जलपुनर्भरणाच्या योजना राबविण्याची गरज आहे. 
 
फळपिक विमाही महत्त्वाचा 
केळीचा पीकविमा एका एकराला 6 हजार 600 रुपये भरले तर त्यापोटी 1 लाख 33 हजार रुपये मिळतात. 2200 आणखी भरले तर गारपिटीचे 44 हजार रुपये अधिकचे मिळतील, असे एकूण 1 लाख 67 हजार रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना विम्यापोटी एका एकराला मिळेल. सहा प्रकारच्या फळांचा विमा काढता येतो. दरवर्षी केळी पट्ट्याला मे- जून महिन्यात वादळाचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांनी फळ पीकविमा काढल्यास त्यांना फायदा होईल. गतवर्षी 19 कोटी पिकविम्यापोटी शेतकऱ्यांनी भरले होते त्यापोटी त्यांना 94 कोटींची भरपाई मिळाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com