पोलिसांनी केले प्रेमी युगुलाचे शुभमंगल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

 
पाचोरा : प्रेमाच्या आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेऊन पलायन केलेल्या व घरच्यांच्या ताब्यात दिल्यास आत्महत्या करण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या प्रेमी युगुलाचे पाचोरा पोलिसांनी शुभमंगल सावधान केले. (ता 31) रोजी रात्री विवाहसोहळा पार पडला. 

 
पाचोरा : प्रेमाच्या आणि आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेऊन पलायन केलेल्या व घरच्यांच्या ताब्यात दिल्यास आत्महत्या करण्याचा निर्धार व्यक्त करणाऱ्या प्रेमी युगुलाचे पाचोरा पोलिसांनी शुभमंगल सावधान केले. (ता 31) रोजी रात्री विवाहसोहळा पार पडला. 
याबाबत माहिती अशी की सामनेर ता. पाचोरा येथील शेतमजूर असलेल्या सुकदेव पाटील यांचा बारावीत शिकणारा मुलगा राहुल हा जळगाव येथे जैन इरिगेशनमध्ये नोकरीस होता जळगाव येथील कै विजय पाटील यांची कन्या अमृता ही तिची आजी म्हणजे आईची आई सामनेर येथेच राहुलच्या घराशेजारी वास्तव्यास असल्याने अमृताचे सामनेर येथे आजीकडे सतत येणे-जाणे होते त्यामुळे राहुल व अमृता यांचे सूत जमले गेल्या दहा वर्षांपासून दोघे एकमेकांच्या प्रेमात पडून एक दुजे के लिये झाले होते. दोघांनी प्रेमविवाहाचा विचार केला परंतु अमृताच्या घरच्यांचा विरोध असल्याने दोघांनी ता 15 मार्च रोजी पलायन केले दोघांच्या हरवल्याची नोंद पाचोरा व जळगाव पोलिसात करण्यात आली आहे. 
राहुल व अमृता रेल्वेने शिर्डी कडे जात असताना त्यांना रेल्वे डब्यात काही तुतीय पंथी भेटले व त्यांनी त्यांना सोलापूर येथे नेले पाच-सात दिवस दोघांचा चांगल्या पद्धतीने सांभाळही केला पण तेथे राहणे शक्‍य नसल्याने व जवळचे पैसे संपत आल्याने दोघे ता. 31 रोजी पाचोरा पोलिसात हजर झाले पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन दोघांच्या घरच्यांना बोलवून घेतले व त्यांचा स्वीकार करण्यास सांगितले परंतु अमृताच्या घरच्यांनी आपला विरोध कायम ठेवला घरच्यांच्या ताब्यात देऊन आम्हाला वेगळे केल्यास आम्ही दोघे आत्महत्या करून आमचे जीवन संपवू असे त्या प्रेमीयुगुलाने स्पष्ट केले व दोघेही सज्ञान असल्याने पोलीस निरीक्षक निरिक्षक शामकांत सोमवंशी यांनी दोघांचे शुभमंगल करण्याचा निर्णय घेतला मंगळसूत्र बाशिंग जोडवे यासह दोघांना नवीन कपडे आणून त्यांचा विधिवत विवाह सोहळा जारगाव येथील नाथ मंदिरात पार पडला माजी नगराध्यक्ष बंडू चौधरी व सामाजिक कार्यकर्ते अनिल येवले यांनी वधू-वरांचे मामा म्हणून अंतरपाट धरला व विधी पूर्ण केला पुरोहित भावेश यांनी हा विवाह सोहळा विधीवत पार पाडला. 
यावेळी पोलिस शिपाई श्रीकांत गायकवाड, अनमोल पटेल, राहुल सोनवणे, राहुल बेहेरे, महिला होमगार्ड प्रतिभा पाटील, वैशाली इंगळे, उर्मिला पाटील, यांचेसह डॉ. शशी साबळे, अजय पाटील, किशोर कोळी, सचिन पाटील, भारती वाडेकर, राहुलचे माता-पिता उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon police love marrege