मुंबई गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज लोहारांना जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 जानेवारी 2019

जळगाव: चाळीसगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आयुर्वेदिक विद्यालयाचे संस्थापक उत्तम महाजन यांना खंडणी मागून डांबून ठेवल्याप्रकरणी चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक व मुंबई येथील गृहरक्षक दलाचे पोलीस अधिक्षक मनोज प्रभाकर लोहार यांच्यासह साथीदार धीरज येवले या यांना जन्मपेठेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.तिसरा संशयित आरोपी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्‍वास निंबाळकर याला दोषमुक्त केले आहे. न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयाने शनिवारी (ता.19) हा निकाल दिला. 

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल खंडणीच्या गुन्ह्यात चाळीसगाव परिमंडळाचे तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक मनोज लोहार व त्यांचा साथीदार तत्कालीन कॉन्स्टेबल धीरज जेवले यांना बुधवारी न्यायालयाने दोषी ठरविले होते. तर अन्य एक संशयित विश्वास निंबाळकर याला दोषमुक्त केले होते. न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. त्यात 19 जानेवारी रोजी खटल्यात शिक्षेवर कामकाज झाले. खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, लोहार यांच्यावतीने ऍड. नीलेश घाणेकर (औरंगाबाद) व ऍड. सुधीर कुळकर्णी (जळगाव), विश्वास निंबाळकर यांच्यावतीने ऍड. आर. के. पाटील, धीरज येवले यांच्यावतीने ऍड. सागर चित्रे, मूळ फिर्यादीतर्फे ऍड. पंकज अत्रे व ऍड. अविनाश पाटील यांनी काम पाहिले. 
 
असे आहे प्रकरण 
चाळीसगाव (जि.जळगाव )येथील तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य डॉ. उत्तमराव महाजन यांच्याविरुद्ध आलेल्या तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल न करणे, तसेच संस्थेतील गैरकारभार बाहेर येऊ न देण्यासाठी मनोज लोहार यांनी तत्कालीन उपनिरीक्षक विश्वासराव पाटील व कॉन्स्टेबल धीरज येवले यांच्या माध्यमातून डॉ. महाजन यांच्याकडे 60 लाख रुपये खंडणी मागितली होती. तडजोडीअंती 25 लाख रुपये देण्याचे निश्‍चित झाले होते. खंडणी दिली नाही म्हणून लोहार यांनी डॉ. महाजन यांना 30 जून 2009 रोजी डांबून ठेवले आणि दुसऱ्या दिवशी 1 जुलै रोजी दुपारी सुटका केली. यानंतर 16 जुलै 2009 रोजी मनोज लोहार, विश्वास निंबाळकर व धीरज येवले या तिघांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला या प्रकरणात भादंविच्या 343, 346, 348, 364 (अ), 385, 506 कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Web Title: marathi news jalgaon police manoj lohar