लोकशाहीचा रक्षकच आयुष्यभर मतदानापासून वंचित! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 एप्रिल 2019

जळगाव : जिल्हा पोलिस दलात सहायक फौजदारपदावर कार्यरत आणि वयाची साठी पूर्ण करीत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने आयुष्यात एकदाही मतदान केले नसल्याचा प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, महापालिका, विधानसभा, इतकेच नव्हे; तर लोकसभा निवडणुकीची अनेक वेळा जबाबदारी पार पाडली. मात्र, नोंदणी करूनही मतदारयादीत नाव येत नसल्याने एकदाही मतदान करता आले नाही, अशी खंत सहायक फौजदार राजाराम पाटील यांनी "सकाळ'कडे व्यक्त केली. 

आसनखेडा (ता. पाचोरा) येथील मूळ रहिवासी राजाराम लक्ष्मण पाटील (वय 58) हे वयाच्या 18 वर्षानंतर लगेच 1979 मध्ये जिल्हा पोलिस दलात रुजू झाले. सरकारी नोकरी भेटली म्हणून गाव सोडून तेव्हाच निघून आले. पोलिस खात्यात दाखल झाल्यानंतर अगदी प्रशिक्षणातही त्यांना निवडणूक बंदोबस्ताची ड्यूटी लागली आणि तेव्हापासूनच पाटील यांनी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पालिका, महापालिका विधानसभा आणि लोकसभा आदी सर्वच निवडणुकांमध्ये सलग बंदोबस्ताची "ड्यूटी' आदी कर्तव्य बजावले. मात्र, आजतागायत एकदाही त्यांच्या तर्जनीला शाई लागली नाही. अर्थात, एकदाही त्यांना मतदानाची संधी मिळू शकलेली नाही. 

मतदारयादीत नावच येत नाही 
गाव सोडल्यानंतर पोलिस दलात रुजू झाले. नंतर पत्नी कल्पना हिच्याशी विवाह होऊन मुलगा, दोन मुली झाल्या. मुलींचे लग्न झाले. मुलगा प्रभाकर उच्चशिक्षणाची तयारी करतोय. मतदारयादीत नाव यावे, यासाठी पाटील यांनी अनेक वेळा अर्ज भरून दिले. मात्र, त्यांचे नाव मतदारयादीत येतच नाही. पाचोऱ्यानंतर उल्हासनगर येथे अर्ज भरून दिला. कासोदा येथे ड्यूटीवर असताना एरंडोलच्या तत्कालीन तहसीलदारांनी स्वत: त्यांचा अर्ज भरून घेतला. एकदा पत्नीसह दोघांचा अर्ज भरला. नंतर मुले मोठी झाल्यानंतर त्यांच्यासोबत अर्ज भरला. या सर्वांचे मतदारयादीत नाव आले. मात्र, राजाराम पाटील यांच्या नावाचे यादीला जणू वैरच असल्याने अद्याप त्यांचे नावच मतदारयादीत नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले आहे. 

Web Title: marathi news jalgaon police not otting